Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

Yashasvi Jaiswal: 'माझ्या आई-वडिलांसाठी...', पहिल्या कसोटी शतकानंतर जयस्वाल इमोशनल, पाहा व्हिडिओ

WI vs IND, 1st Test: पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर यशस्वी जयस्वाल भावूक झाला होता.

Pranali Kodre

Yashasvi Jaiswal gets emotional after 1st Test Century:

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. हा 21 वर्षीय जयस्वालचा पहिलाच कसोटी सामना असून त्याने हा सामना खास बनवला आहे. पहिल्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली. त्यामुळे तो हे शतक झळकावल्यानंतर खूपच भावुक झाला होता.

जयस्वालने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पणातील शतक त्याच्या आई-वडिलांना समर्पित केले आहे. त्याने भारताच्या पहिल्या डावात 215 चेंडूत शतक केले. त्याने सांगितले की हे शतक त्याच्यासाठी आणि कुटुंबासाठी खुप खास होता.

खूप भावूक क्षण होता, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि त्या सर्वांसाठी ज्यांनी मला पाठिंबा दिला आहे. कारण माझ्यासाठी हा मोठा प्रवास राहिला आहे. मी सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी मला कोणत्याही प्रकारे मदत केली आहे. मी माझ्या आई-वडिलांना हे शतक समर्पित करू इच्छितो, कारण त्यांचेही मोठे योगदान माझ्या कारकिर्दीत राहिले आहे. मी जास्त काही बोलणार नाही, पण नक्कीच खुश आहे. ही फक्त सुरुवात आहे, अजून खूप काही करायचे आहे.
यशस्वी जयस्वास, भारतीय क्रिकेटपटू

जयस्वालने पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माबरोबर सलामीला 229 धावांची विक्रमी भागीदारीही केली. वेस्ट इंडिजविरुद्धची ही कसोटीतील भारतीय सलामीवीरांनी केलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली.

दरम्यान, रोहितने देखील 103 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर शुभमन गिलही 6 धावांवर लगेचच बाद झाला. पण नंतर जयस्वालला विराट कोहलीने चांगली साथ दिली. जयस्वालने संपूर्ण दुसऱ्या दिवशी फलंदाजी केली. तो दुसऱ्या दिवसाखेरनंतरही नाबाद राहिला.

दुसऱ्या दिवसाखेर जयस्वाल 350 चेंडूत 143 धावांवर नाबाद आहे. त्याच्याबरोबर विराट कोहली 36 धावांवर नाबाद आहे. जयस्वाल आणि विराट यांच्यात दुसऱ्या दिवसाखेर 72 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे.

तसेच भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 113 षटकात 2 बाद 312 धावा केल्या असून भारतीय संघ 162 धावांनी आघाडीवर आहे. आता तिसऱ्या दिवशी जयस्वालला द्विशतकाची संधी आहे. जर त्याने द्विशतक केले, तर तो पदार्पणाच्या कसोटीत द्विशतक करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरेल.

दरम्यान, वेस्ट इंडिजचा पहिला डाव 64.3 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT