R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

R Ashwin Records: अश्विनची मोठी झेप! विंडिजविरुद्ध 12 विकेट्स घेत भल्याभल्या दिग्गजांना टाकलं मागे

India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 12 विकेट्स घेत आर अश्विनने 3 मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

R Ashwin three big records during West Indies vs India 1st test:

भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमिनिका येथे झालेल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात अनुभवी फिरकीपटू आर अश्विनचे मोठे योगदान राहिले.

या सामन्यात अश्विनने पहिल्या डावात 24.3 षटकात 2.40 च्या इकोनॉमी रेटने 60 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने दुसऱ्या डावात 21.3 षटकात 3.30 च्या इकोनॉमी रेटने 71 धावा देत 7 विकेट्स घेतल्या.

त्यामुळे त्याने या सामन्यात दोन्ही डावात मिळून 131 धावा खर्च करताना 12 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. याबरोबरच त्याने काही विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

कुंबळेची बरोबरी

कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची अश्विनची ही 8 वी वेळ होती. त्यामुळे त्याने भारतासाठी सर्वाधिकवेळा कसोटी सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळेची बरोबरी केली आहे. कुंबळेने देखील 8 वेळा सामन्यांत 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

  • भारतासाठी सर्वाधिकवेळा कसोटी सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज -

  • 8 वेळा - अनिल कुंबळे

  • 8 वेळा - आर अश्विन

  • 5 वेळा - हरभजन सिंग

परदेशात तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी

दरम्यान, अश्विनने भारतासाठी परदेशात कसोटी सामना खेळताना तिसऱ्या क्रमांचे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन केले आहे.

भारताकडून परदेशात कसोटी सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विक्रम भागवत चंद्रशेखर यांच्या नावावर आहे. त्यांनी 1977 मध्ये मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 104 धावा खर्चून 12 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर इरफान पठाण असून त्याने 2005 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे 126 धावा खर्चून 12 विकेट्स घेतल्या होत्या.

  • परदेशात कसोटी सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन भारतीय गोलंदाज -

  • 12/104 - भागवत चंद्रशेखर (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, 1977)

  • 12/126 - इरफान पठाण (विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे, २००५)

  • 12/131 - आर अश्विन (विरुद्ध वेस्ट इंडिज, डॉमिनिका, २०२३)

  • 12/279 - अनिल कुंबळे (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2004)

  • 11/96 - इरफान पठाण (विरुद्ध बांगलादेश, ढाका, 2004)

हरभजन सिंगला टाकले मागे

भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्येही आर अश्विनने आता हरभजन सिंगला मागे टाकले असून आता त्याच्यापुढे केवळ अनिल कुंबळे आहे. अश्विनने भारतासाठी 271 सामने खेळताना 352 डावात 709 विकेट्स घेतल्या आहेत. हरभजनच्या नावावर भारतासाठी 365 सामने खेळताना 442 डावात 707 विकेट्सचा समावेश आहे.

  • भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज

  • 953 - अनिल कुंबळ (499 डाव)

  • 709 - आर अश्विन (352 डाव)

  • 707 - हरभजन सिंग (442 डाव)

  • 687 - कपिल देव (448 डाव)

  • 597 - झहीर खान (373 डाव)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

Goa News Live: लुथरा बंधूंच्या अटकेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे मौन

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT