R Ashwin on team culture: 'पूर्वीसारखे टीममेट्स आता मित्र नाही, तर फक्त सहकारी...' अश्विनचे परखड भाष्य

आर अश्विनने क्रिकेट संघातील बदललेल्या वातावरणाबद्दल परखड मत मांडले आहे.
R Ashwin
R AshwinDainik Gomantak
Published on
Updated on

R Ashwin on team culture: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन नेहमीच त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. तो एक हुशार क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर तो क्रिकेटच्या विविध पैलूंबद्दल खुलेपणाने चर्चा करताना दिसतो. नुकतेच त्याने क्रिकेट संघांच्या वातावरणात झालेल्या बदलाबद्दल मत व्यक्त केले आहे.

आर अश्विनने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अधुनिक क्रिकेटमध्ये बदललेल्या संस्कृतीबद्दल परखड मत मांडताना सांगितले की यापूर्वी संघातील खेळाडू हे मित्र होते, पण आता फक्त सहकारी झाले आहेत.

R Ashwin
WTC 2023 Final, Opinion: खरी चूक रोहित शर्माची की...?

अश्विन म्हणाला, 'हा खूप सखोल विचार करण्याचा विषय आहे. सध्याच्या युगात सर्वजण सहकारी आहेत. पूर्वी जेव्हा क्रिकेट खेळले जायचे, तेव्हा तुच्या संघसहकारी तुमचे मित्र होते. आता ते फक्त सहकारी आहेत. हाच मोठा फरक आहे.'

'कारण इथे लोक आता स्वत:ला पुढे नेण्याचा आणि त्यांच्या आजू-बाजूला बसलेल्या लोकांपेक्षा पुढे राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणालाही 'कसा आहेस?', हे विचारण्यासाठी वेळ नाही.'

अश्विन पुढे म्हणाला, 'खरंतर, मला वाटते की जेवढे तुम्ही शेअर कराल, तेवढे तुमचे क्रिकेट चांगले होत जाते. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे तंत्र आणि त्याचा प्रवास समजून घेता, तेव्हा तुम्ही आणखी चांगले होत जाता. पण हे ज्याप्रमाणात व्हायला हवे, त्याच्या आसपासही आता होत नाही. कोणीह तुमची मदत करायला येत नाही आणि हा एकाकी प्रवास झाला आहे.'

सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाच गोलंदाज असलेला अश्विन असेही म्हणाला, 'नक्कीच, तुम्ही एखाद्या चांगल्या प्रशिक्षकाकडे जाऊ शकता. तुम्ही पैसे देऊन तिथे जाऊ शकता, सराव करू शकता. पण कधीकधी आपण हे विसरतो की क्रिकेट हा स्वयंशिक्षित खेळ आहे.'

R Ashwin
WTC 2023 Final मधील पराभवानंतर आर अश्विनची आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'पराभव निराशाजनक, पण...'

दरम्यान, अश्विन काही दिवसांपूर्वी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने चर्चेत आला होता. त्याला संघात न खेळवल्याबद्दल सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी भारतीय संघव्यवस्थापनेवर टीका केली होती.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अश्विन कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा अनिल कुंबळेनंतरचा (619 विकेट्स) दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 92 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 474 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com