Kevin Sinclair cartwheel celebration Dainik Gomantak
क्रीडा

Viral Video: 'कार्टव्हील' सेलिब्रेशनने क्रिकेट विश्व थक्क, सिंक्लेअरने फेडले प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे

Cartwheel Celebration: कार्टव्हील सेलिब्रेशन करणारे खेळाडू अनेकदा फुटबॉल सामन्यांमध्ये दिसतात, पण केविनने ते क्रिकेटमध्ये केले. तेही कसोटी सामन्यात, याआधी चाहत्यांनी कधीच अनुभवले नसेल.

Ashutosh Masgaunde

West Indies spinner Kevin Sinclair made his maiden Test wicket a memorable one by doing a cartwheel after taking his wicket:

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना असे काही पाहायला मिळाले जे सहसा फुटबॉलच्या मैदानावर घडते.

वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज केविन सिंक्लेअरने विकेट घेतल्यानंतर कार्टव्हील करत आपली पहिली कसोटी विकेट सर्वांसाठी संस्मरणीय बनवली.

कार्टव्हील सेलिब्रेशन करणारे खेळाडू अनेकदा फुटबॉल सामन्यांमध्ये दिसतात, पण केविनने ते क्रिकेटमध्ये केले. तेही कसोटी सामन्यात, याआधी चाहत्यांनी कधीच अनुभवले नसेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी केविन सिंक्लेअरने समालोचकांना आणि ब्रिस्बेनच्या प्रेक्षकांना चकित केले.

उजव्या हाताच्या ऑफ-स्पिनरने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याला टाकलेल्या चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरील काठाला लागला आणि स्लिपला गेला आणि ॲलेक अथानाझने तेथ उत्तम झेल घेतला. आणि यानंतर सिंक्लेअरने केलेल्या 'कार्टव्हील' सेलिब्रेशनने अवघ्या क्रिकेट विश्वाचे मन जिंकले.

सामन्याबद्दल बोलायचे तर तेगनारायण चंद्रपॉलची विकेट घेत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजची धावसंख्या 13/1 होती आणि त्यांच्याकडे 35 धावांची आघाडी होती.

दिवस-रात्र कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 311 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने खराब सुरुवातीपासून सावरले आणि वेस्ट इंडिजला मोठी आघाडी देण्यापासून रोखले.

कर्णधार पॅट कमिन्सने रात्री उशिरा २८९/९ धावसंख्येवर डाव घोषित केला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती आणि एकेकाळी संघाची धावसंख्या 24-4 आणि 54-5 अशी होती. त्यानंतर अवघ्या 49 चेंडूत 65 धावा करणाऱ्या कांगारू संघाला यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीच्या खेळीने तारले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेस्ट इंडिजकडे 35 धावांची आघाडी होती. दोन्ही संघांचा पहिला डाव संपला आहे.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजची धावसंख्या १३/१ आहे. आता कॅरेबियन संघ आणखी किमान 300 धावा करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर वेस्ट इंडिजला छोट्या धावसंख्येवर बाद करण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach: मित्रांसोबतची गोवा ट्रिप ठरली अखेरची! 23 वर्षीय हैद्राबादचा तरुण समुद्रात बुडाला; कळंगुटमधील घटना

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

SCROLL FOR NEXT