Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI, 2nd Test: विंडिजची कडवी झुंज, पण सामन्यात भारताचे वर्चस्व; अखेरचा दिवस ठरणार निर्णायक

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघाचा दुसऱ्या कसोटीच्या अखेरचा दिवशी विजयाचा प्रयत्न असेल.

Pranali Kodre

India vs West Indies, 4th Day, Report: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे गुरुवारपासून (20 जुलै) दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याचा निकाल पाचव्या दिवशी मिळणार आहे.

चौथ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकात 2 बाद 76 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून तेजनारायण चंद्रपॉल 24 धावांवर आणि जर्मेन ब्लॅकवूड 20 धावांवर नाबाद खेळत आहेत. वेस्ट इंडिजला अखेरच्या दिवशी विजयासाठी अद्याप 289 धावांची गरज आहे, तर भारताला 8 विकेट्सची गरज आहे.

वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात क्रेग ब्रेथवेट आणि किर्क मॅकेन्झी यांच्या विकेट्स गमाव्या आहेत. ब्रेथवेटने 28 धावांची खेळी केली. तसेच मॅकेन्झीला भोपळाही फोडता आला नाही. या दोघांच्याही विकेट्स आर अश्विनने घेतल्या.

तत्पुर्वी, भारताने पहिला डाव 24 षटकात 2 बाद 181 धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 364 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी अर्धशतके झळकावली.

रोहितने 44 चेंडूत 57 धावा केल्या, तर ईशानने 34 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. तसेच यशस्वी जयस्वालने 38 आणि शुबमन गिलने नाबाद 29 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून शॅनन गॅब्रिएल आणि जोमेल वॉरिकन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

चौथ्या दिवशी 109 षटकापासून आणि 5 बाद 229 धावांपासून केली. यावेळी वेस्ट इंडिजकडून एलिक अथानाझ 37 धावांवर आणि जेसन होल्डर 11 धावांवर नाबाद खेळत होते. पण तिसऱ्या दिवसाप्रमाणे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना चौथ्या दिवशी प्रतिकार करता आला नाही आणि केवळ 26 धावात त्यांनी उर्वरित 5 विकेट्स गमावल्या.

त्याआधी चौथ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात मुकेश कुमारने एलिक अथानाझला 37 धावांवर पायचीत केले. त्यानंतर उर्वरित चारही विकेट्स मोहम्मद सिराजने घेत त्याच्या 5 विकेट्स पूर्ण केल्या. त्याने तिसऱ्या दिवशी एक विकेट घेतली होती.

सिराजने होल्डरला 15 धावांवर बाद केले. तर अल्झारी जोसेफ 4 धावांवर, केमार रोच 4 धावांवर आणि शॅनन गॅब्रिएल 0 धावांवर बाद झाला. जोमेल वॉरिकन 7 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव 115.4 षटकात 255 धावांवर संपुष्टात आला.

त्यामुळे भारताने 183 धावांची मोठी आघाडी मिळवली. वेस्ट इंडिजकडून या डावात कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 75 धावांची खेळी केली होती.

भारताकडून या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश कुमार आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT