West Indies Dainik Gomantak
क्रीडा

West Indies Coach: मोठी घोषणा! दोन टी20 वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराची वेस्ट इंडिजचा कोच म्हणून नियुक्ती

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी टी20, वनडे आणि कसोटी क्रिकेट संघांसाठी दोन वेगवेगळ्या प्रशिक्षणांची नियुक्ती केली आहे.

Pranali Kodre

West Indies Cricket Coach: वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी मर्यादीत षटकांच्या आणि कसोटी क्रिकेट संघांसाठी दोन वेगवेगळ्या प्रशिक्षणांची नियुक्ती केली आहे.

वेस्ट इंडिजने वनडे आणि टी20 क्रिकेट संघासाठी माजी कर्णधार डॅरेन सॅमीची प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच माजी यष्टीरक्षक फलंदाज अँड्री कोली यांची वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे,.

यावरून लक्षात येते की वेस्ट इंडिजनेही वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारांसाठी वेगवेगळे प्रशिक्षक नेमण्याच्या इंग्लंडच्या मार्गाचा अवलंब केलेला आहे. यापूर्वी इंग्लंडनेही दोन वेगवेगळे प्रशिक्षक नेमले आहेत.

मर्यादीत षटकांसाठी प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलेल्या डॅरेन सॅमीने यापूर्वी वेस्ट इंडिजला त्याच्या नेतृत्वाखाली 2012 आणि 2016 साली टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. तसेच तो वेस्ट इंडिजचा एक दिग्गज खेळाडू म्हणूनही ओळखला जातो. त्याने यापूर्वी पाकिस्तान सुपर लीग आणि कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

तसेच आता सॅमीसाठी वेस्ट इंडिजचा प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका संयुक्त अरब अमिरातीविरुद्धची (UAE) वनडे मालिका असेल. ही मालिका शारजामध्ये जून महिन्यात होणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजला झिम्बाब्वेमध्ये 2023 वर्ल्डकप पात्रता फेरी खेळायची आहे.

त्याचबरोबर अँड्री कोली यांची कसोटी प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका भारताविरुद्ध असेल. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात जुलैमध्ये कसोटी मालिका होणार आहे.

या नव्या भूमिकेबद्दल सॅमी म्हणाला, 'हे एक आव्हान असेल, पण मी यासाठी आतुर आहे. मी या संधीबद्दल उत्सुक आहे, विशेषत: आमच्याकडे जे खेळाडू आहेत, त्यांना पाहून आणि मला विश्वास आहे की ड्रेसिंग रुममध्ये मी माझा प्रभाव पडू शकतो.'

तो पुढे म्हणाला, 'मी जेव्हा या संघाकडे पाहातो, तेव्हा मला भरपूर प्रतिभा दिसत आहे आणि मी दक्षिण आफ्रिकेत नवे कर्णधार शाय होप आणि रोव्हमन पॉवेल यांच्या नेतृत्वाखाली मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये ती प्रतिभा पाहिली आहे. अँड्री कोलीबरोबर मला विश्वास आहे की आम्ही चांगली कामगिरी करू.'

तसेच कोली म्हणाले, 'मी हे आव्हान स्विकारण्यात तयार आहे. तसेच आम्ही त्या संधींकडे लक्ष केंद्रित करू ज्यातून आम्ही कसोटी क्रमवारीत वर जाऊ शकू आणि जून २०२५ मध्ये होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरू शकू.'

आता आगामी काळात सॅमी आणि कोली या दोन नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडिज संघ कशी कामगिरी करणारे हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

Actress Sandhya: ए मालिक तेरे बंदे हम! भारतीय चित्रपटसृष्टीच्या महान पर्वाच्या साक्षीदार 'संध्या'

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT