MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पंजाबविरुद्ध का झाला पराभव? CSK कॅप्टन धोनीने स्पष्टच सांगितले की...

चेन्नई सुपर किंग्सचा रविवारी पंजाब किंग्सविरुद्ध घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला, या पराभवाचे कारण धोनीने स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

CSK Captain MS Dhoni on Defeat Against Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी चेन्नई सुपर किंग्सला पंजाब किंग्सविरुद्ध अखेरच्या चेंडूवर 4 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने संघाकडून कोणती चूक झाली याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने पंजाबसमोर 201 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पंजाबने 20 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना पंजाबकडून सिकंदर रझाने शाहरुख खानबरोबर मिळू तीन धावा पळून काढल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यानंतर धोनी म्हणाला, 'काय करायचे आहे, याची तयारी हवी. आम्ही फलंदाजीवेळी आणजी 10-15 धावा करून शकत होतो. आमची गोलंदाजीची थोडी समस्य आहे. आमचे फलंदाज सतत्याने धावा करत आहेत. मला वाटते की 200 धावा खूप होत्या. पण आम्ही दोन षटके खराब टाकली.'

'आम्हाला परिस्थितीती चांगली माहिती आहे. आम्ही चांगली गोलंदादी केली नाही. याव्यतिरिक्त आम्हाला हे देखील पाहावे लागेल की आमची योजना चूकीची होती का की ती अंमलात आणताना चूक झाली. पाथिरानाने चांगली गोलंदाजी केली. आम्ही पहिल्या सहा षटकात चांगली कामगिरी करू शकलो असतो.'

खंरतर चेन्नईने पंजाब संघ फलंदाजी करत असताना जवळपास 15 व्या षटकापर्यंत सामन्यावर पकड ठेवली होती. पण तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजा यांनी गोलंदाजी केलेल्या 16 आणि 17 व्या षटकात तब्बल 41 धावा निघाल्या. पंजाबकडून या तीन षटकात लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन आणि नंतर जितेश शर्माने मोठे फटके खेळले. त्यामुळे पंजाबने सामन्यात पुनरागमन केले.

पण त्यानंतर पाथिरानाने केलेल्या गोलंदाजीमुळे चेन्नईने सामन्यात आव्हान कायम ठेवले होते. त्यामुळे सामना अखेरच्या चेंडूपर्यंत गेला. पण चेन्नईला हा सामना जिंकता आला नाही.

पंजाबचा विजय

या सामन्यात चेन्नईने कॉनवेच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 200 धावा केल्या होत्या. त्यानंतर 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग अखेरच्या चेंडूवर पंजाबने 6 विकेट्स गमावत पूर्ण केला.

पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने 24 चेंडूत 42 धावांची, लियाम लिव्हिंगस्टोनने 24 चेंडूत 40 धावांची आणि जितेश शर्माने 10 चेंडूत 21 धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबला या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले.

गोलंदाजीत चेन्नईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच पंजाबकडून अर्शदीप सिंग, सिकंदर रझा, राहुल चाहर आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

SCROLL FOR NEXT