IPL 2023: 6,6,6... टीम डेव्हिडने मुंबईला मिळवून दिला जबरदस्त विजय! राजस्थानच्या जयस्वालचे शतक व्यर्थ

रोहितच्या 36 व्या वाढदिवशी मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला पराभवाचा धक्का दिला आहे.
Mumbai Indians
Mumbai IndiansDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Indians vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2023 रविवारी (30 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना झाला. हा सामना मुंबई इंडियन्सने अखेरच्या षटकात 6 विकेट्सने जिंकला. विशेष म्हणजे मुंबईने कर्णधार रोहित शर्माच्या 36 व्या वाढदिवशी हा सामना जिंकला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा आयपीएलच्या इतिहासातील 1000 वा सामना होता.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 19.3 षटकात 4 विकेट्स गमावत 214 धावा करून पूर्ण केला. महत्त्वाचे म्हणजे आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर हा सर्वोच्च धावांचा पाठलाग ठरला आहे. यापूर्वी कधीही 213 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग वानखेडे स्टेडियमवर झाला नव्हता.

या सामन्यात अखेरच्या षटकात मुंबईला 17 धावांची गरज होती. यावेळी राजस्थानकडून जेसन होल्डर गोलंदाजीला आला, तर मुंबईकडून टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा फलंदाजी करत होते. मात्र, डेव्हिडने या षटकाच्या पहिल्या तिन्ही चेंडूंवर तीन षटकार ठोकले आणि मुंबईला विजय मिळवून दिला.

Mumbai Indians
Video: शेवटच्या दोन बॉलवर धोनीचा घणाघात! सलग सिक्स ठोकत CSK ला केले 200 पार...

या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा यांनी सलामीला फलंदाजी केली. पण रोहित 3 धावांवरच संदीप शर्माविरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला. त्यानंतर ईशान किशन आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी डाव सांभाळला. पण त्यांची अर्धशतकी भागादारी 9 व्या षटकात आर अश्विनने तोडली. त्याने ईशानला 28 धावांवर माघारी धाडले.

त्यानंतर आक्रमक खेळत असेलला ग्रीनही 26 चेंडूत 44 धावा करून 11 व्या षटकात बाद झाला. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने डाव पुढे नेला. सूर्यकुमारने सुरुवातीपासूनच आक्रमण करताना तुफानी अर्धशतकी खेळी केली. पण त्याला ट्रेंट बोल्टने 16 व्या षटकात माघारी धाडले. सूर्यकुमारने 29 चेंडूत 55 धावांची खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि टीम डेव्हिडने सामना हातातून निसटणार नाही, याची काळजी घेतली. अखेरीस डेव्हिड 14 चेंडूत आक्रमक 45 धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 5 षटकार मारले. तसेच तिलक 21 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला.

राजस्थानकडून आर अश्विनने 2 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Mumbai Indians
IPL 2023: मार्कंडेच्या कॅचने फिरवली मॅच! धोकादायक सॉल्टला असं केलं आऊट, पाहा Video

तत्पुर्वी, या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने जोस बटलरसह सलामीला उतरत दमदार सुरुवात केली होती. एका बाजूने जयस्वाल आक्रमक खेळत असताना, दुसऱ्या बाजूने बटलर त्याला साथ देत होता. पण बटलरला 8 व्या षटकात पीयुष चावलाने बाद केले. बटलर 19 चेंडूत 18 धावांवरच बाद झाला.

त्यानंतर मधल्या षटकात संजू सॅमसन (14), देवदत्त पडिक्कल (2), जेसन होल्डर (11), शिमरॉन हेटमायर (8), ध्रुव जुरेल (2) असे काही अनुभवी फलंदाज मात्र स्वतात बाद झाला. पण एका बाजूने विकेट्स जात असताना देखील जयस्वालने त्याच्या लयीवर त्याचा परिणाम होऊन दिला नाही. त्याने आक्रमक खेळ सुरू ठेवला होता. त्याने पाहाता पाहाता त्याचे पहिले आयपीएल शतकही केले.

तो अखेरच्या षटकात बाद झाला. जयस्वालने 62 चेंडूत 124 धावांची खेळी करताना 16 चौकार आणि 8 षटकार मारले. अखेरीस आर अश्विन 8 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे राजस्थानने 20 षटकात 7 बाद 212 धावा केल्या.

मुंबईकडून अर्शद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच पीयुष चावलाने 2 विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चर आणि रिली मॅरिडिथ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com