ZIM vs OMA Dainik Gomantak
क्रीडा

ICC World Cup Qualifiers 2023: डान्स, डीआरएस आणि डिसीजन! ओमानच्या कर्णधाराचा सोशल मीडियावर धुमाकूळ

ZIM vs OMA: या सामन्यात झिम्बाब्वे संघाच्या फलंदाजीदरम्यान अशी मजेशीर घटना पाहायला मिळाली ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Ashutosh Masgaunde

सध्या झिम्बाब्वेमध्ये ICC क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीचे (ICC Cricket World Cup Qualifiers 2023) सामने खेळले जात आहेत. गुरूवारी सुपर 6 फेरीत झिम्बाब्वेचा सामना ओमानशी (ZIM vs OMA) झाला.

या सामन्यात झिम्बाब्वे संघाच्या फलंदाजीदरम्यान अशी मजेशीर घटना पाहायला मिळाली ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या घटनेचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाच्या फलंदाजांची चांगली कामगिरी झाली.

त्याचवेळी झिम्बाब्वे संघाच्या डावातील 42 वे षटक कर्णधार झीशान मकसूदने केले. त्याच्या षटकातील पाचवा चेंडू रायन बर्लच्या पायाला लागला, त्यानंतर मकसूदने एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केले, परंतु अंपायरने फलंदाजाला नाबाद घोषित केले.

डावखुरा फिरकी गोलंदाज मकसूद मैदानावरील पंचांच्या निर्णयावर समाधानी नव्हता आणि त्याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला.

यानंतर मजेशीर पद्धतीने डान्स करताना त्याने थर्ड अंपायरला डीआरएसचा इशारा कला. हे करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसूही दिसत होतं. मात्र, तिसऱ्या पंचानेही रायन बर्लला नाबाद घोषित केले.

शॉन विल्यम्सनची शतकी खेळी

या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमावून 332 धावा केल्या. यामध्ये सर्वात मोठे योगदान शॉन विल्यम्सचे होते. त्याने 103 चेंडूत 14 चौकार आणि तीन षटकारांसह 142 धावांची शानदार खेळी केली.

याशिवाय सिकंदर रझा (४२ धावा) आणि ल्यूक जोंगवे (४३* धावा) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

Goa Recruitment: निवड आयोगाची 'भरती प्रक्रिया' कशी असणार? 2023 मध्येच नियमावली तयार; संगणक आधारित 11 परीक्षा यशस्वी

Santa Cruz: 'सांताक्रूझ' ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपली! माफीनाम्यावरुन गोंधळ; घरपट्टीच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

SCROLL FOR NEXT