नॉर्थ झोनचा गोलंदाज हर्षित राणाने दुलीप ट्रॉफी 2023 च्या उपांत्यपूर्व फेरीत आपल्या धडाकेबाज शतकाने विरोधी संघाची दाणादाण उडवली.
नॉर्थ ईस्ट झोनविरुद्धच्या या सामन्यात हर्षितने अवघ्या ७५ चेंडूत शतक पूर्ण केले. हर्षित संघासाठी 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने नाबाद 122 धावा केल्या.
हर्षितच्या या खेळीत 12 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश आहे.
हर्षित राणाचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक होते. याआधी हर्षितने पाच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये केवळ 152 धावा केल्या होत्या.
दिल्लीचा 21 वर्षीय हर्षित प्रामुख्याने गोलंदाजी करतो परंतु दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने बॅटनेही आपली जादू दाखवली.
हर्षितने नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही कोलकाता नाईट रायडर्सकडून आपली क्षमता दाखवली आहे.
हर्षित आयपीएल २०२३ मध्ये केकेआरकडून पदार्पण केले होते. गोलंदाजीत त्याने दमदार खेळ दाखवत आपल्या वेगाने अनेकांना प्रभावित केले.
आयपीएलमध्ये त्याला एकूण 8 सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याने 6 विकेट घेतल्या.
हर्षितशिवाय निशांत संधूनेही नॉर्थ झोनकडून 150 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. निशांत आणि हर्षित यांच्याशिवाय ध्रुव शौरीनेही डावात १३५ धावा केल्या.
या तीन शतकांच्या जोरावर नॉर्थ झोनने सामन्यात 8 गडी गमावून 540 धावांची मजल मारली आहे. त्यामुळे गोलंदाजांना कोणत्याही दबावाशिवाय गोलंदाजी करता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.