भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. जडेजानेही कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. बर्मिंगहॅम कसोटीत स्थान नाकारण्यात आल्यानंतर अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन नाराज नाही झाला. (Watch the video of Ravichandran Ashwin's amazing catch)
चौथ्या दिवशी सराव सत्रादरम्यान त्याने हवे मध्ये एका हाताने चेंडू पकडत सर्वांनाच चकित केले आहे. अश्विनच्या या उत्कृष्ट झेलवर गॅलरीत प्रेक्षक बसलेले भारतीय चाहतेही खूश झाले आहेत. प्रेक्षकांनी कॅचचा आनंद घेत भारतीय खेळाडूला प्रोत्साहन दिले.
रविचंद्रन अश्विन हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अशा स्थितीत बर्मिंगहॅम कसोटीसाठी अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न करणे हा अत्यंत आश्चर्यकारक निर्णय राहिला होता. मात्र, तेथील परिस्थिती पाहता संघ व्यवस्थापनाने अतिशय विचारपूर्वकच हा निर्णय घेतला होता. बर्मिंगहॅम कसोटी संपल्यानंतर प्रश्न निर्माण होणारच आहेत की अश्विनला निर्णायक संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय योग्य होता का?
रविचंद्रन अश्विनने भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 86 सामने खेळले असून 162 डावात 24.1 च्या सरासरीने 442 बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 23 वेळा चार विकेट्स आणि 30 वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 59 धावांत सात बळी घेतले.
त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने संघासाठी इतक्याच सामन्यांच्या 123 डावांत 26.9 च्या सरासरीने 2931 धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतके आणि 12 अर्धशतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विनने वैयक्तिक सर्वोत्तम फलंदाजी 124 धावांची आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.