आधीच कंगाल, त्यात आता लीगचाही पत्ता कट, पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय मालकांचा दणका; आंतरराष्ट्रीय लीगमधून होणार हकालपट्टी?

Pakistan Players Banned The Hundred : पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. इं
Pakistan Players Banned The Hundred
Pakistan Players Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Players Banned The Hundred : पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. इंग्लंडमधील प्रसिद्ध क्रिकेट लीग 'द हंड्रेड' मध्ये आता पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागावर टांगती तलवार आली आहे. या स्पर्धेतील ज्या संघांची मालकी अंशतः भारतीय प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझींकडे आहे, त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्याचा किंवा त्यांना न खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. यामुळे मोहम्मद आमीर, शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान यांसारख्या खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 'द हंड्रेड'मधील मॅनचेस्टर सुपर जायंट्स, एमआय लंडन, सदर्न ब्रेव्ह आणि सनरायझर्स लीड्स या चार संघांचे मालक भारतीय आहेत. या संघांनी आगामी हंगामासाठी आपल्या ताफ्यात कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूचा समावेश न करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, 'द हंड्रेड'च्या आगामी हंगामासाठी 11 आणि 12 मार्च रोजी लंडनमध्ये लिलाव होणार आहे. या लिलावासाठी जगभरातील 18 देशांतील सुमारे 1000 खेळाडूंची नोंदणी झाली आहे, मात्र आयपीएलशी संबंधित या चार फ्रँचायझी पाकिस्तानच्या खेळाडूंवर बोली लावणार नाहीत, असे स्पष्ट दिसत आहे.

Pakistan Players Banned The Hundred
IND vs PAK: "पाकिस्तान टीम मी माझीच मानतो, पराभवामुळे मला...", पाकड्यांच्या पराभवाचं भारताच्या माजी न्यायमूर्तींना दु:ख

या संदर्भात बीबीसीच्या एका अहवालात ईसीबीच्या (ECB) वरिष्ठ अधिकाऱ्याचा दाखला देण्यात आला आहे. या अधिकाऱ्याने अनौपचारिकरीत्या सांगितले की, आयपीएलशी संबंधित फ्रँचायझी पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी करण्याच्या प्रयत्नात नाहीत. काही काळापूर्वी ईसीबीचे कार्यकारी अध्यक्ष रिचर्ड गोल्ड यांनी आश्वासन दिले होते की, भारतीय गुंतवणूक आली तरी खेळाडूंमध्ये देशाच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता हे आश्वासन फोल ठरताना दिसत आहे.

Pakistan Players Banned The Hundred
IND vs PAK: ईशान किशन ठरला 'हिरो', गोलंदाजांनी मोडलं पाकड्यांचं कंबरडं; हायहोल्टेज सामन्यात भारताचा 61 धावांनी दणदणीत विजय

भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन्ही देश केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. हीच परिस्थिती आता जगभरातील विविध लीगमध्येही पाहायला मिळत आहे. आयपीएल मालकीचे संघ केवळ इंग्लंडमध्येच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेची 'SA20' आणि वेस्ट इंडिजमधील 'CPL' मध्येही पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या संघात स्थान देत नाहीत. दुबईतील 'ILT20' मध्येही केवळ अमेरिकन मालकीचा डेझर्ट वायपर्स हा संघ पाकिस्तानी खेळाडूंना संधी देतो. त्यामुळे आता 'द हंड्रेड'च्या लिलावात या खेळाडूंना दुसरे कोणी खरेदी करते की त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com