

Bicholim Bypass Road Landslide : येथील चौपदरी बगलमार्गावरील धोकादायक अवस्थेत असलेली ''ती'' दरड दिवसेंदिवस खचत असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. वेळीच ही दरड हटवली नाही तर ती कोसळून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीती वाहनचालकांसह जागृत नागरिक व्यक्त करीत आहेत.
नाईकनगर परिसरात दरड खचण्यापूर्वी या बगलमार्गावर दोन ठिकाणी दरड कोसळल्या होत्या. त्यामुळे बगलमार्गावरील सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी ही दरड हटवून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
गेल्या वर्षी भर पावसात जुलै महिन्यात वाठादेव-व्हाळशी या चौपदरी बगलमार्गावर एक भलामोठा दगडवजा दरड खचली होती. नाईकनगर परिसरात व्हाळशीच्या दिशेने जाताना डाव्या बाजूने ही दरड खचली आहे. ही दरड रेलिंगला अडकून राहिल्याने त्यावेळी संभाव्य अनर्थ टळला होता. ही दरड खचून सात महिने होत आले आहेत. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने दरड काढण्याकडे अजूनतरी दुर्लक्ष झाले आहे.
यापूर्वी दोन ठिकाणी कोसळली दरड
जून २०२४ मध्ये या बगलमार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर लगेचच याच बगलमार्गावर दोन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर धोका ओळखून दरड कोसळलेल्या परिसरात कडा कापून बगलमार्ग सुरक्षित करण्यात आला.
दरड कोसळलेल्या भागात जोड रस्ताही बांधण्यात आला आहे. मात्र सहा महिन्यांपूर्वी बगलमार्गाच्या दिशेने खचलेली आणि कोसळण्याच्या वाटेवर असलेली दरड मात्र अजून तशीच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.