गोवा ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीपाद नाईक बिनविरोध

समितीसाठी एकमत; एकूण 13 जागांसाठी तेवढेच अर्ज दाखल
Shripad Naik
Shripad NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या (जीओए) कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक बिनविरोध असतील. समितीच्या एकूण 13 जागांसाठी तेवढेच अर्ज आल्यामुळे निवडणूक होणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.

जीओए निवडणूक अधिकारी अॅड. गौरांग पाणंदीकर यांनी सांगितले, की कार्यकारी समिती निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याचा काल 5 जुलै हा शेवटचा दिवस होता. एकूण 13 जागांसाठी तेवढेच अर्ज आले आहेत. अर्जांची गुरुवारी 7 जुलै रोजी छाननी होईल. त्यानंतर आपण अहवाल सादर करणार, असंही ते म्हणाले.

गोवा ऑलिंपिक असोसिएशनची आमसभा आणि निवडणूक 15 जुलै रोजी होणार आहे. कार्यकारी समिती उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर बिनविरोध निवडणूक प्रक्रियेवर आमसभा शिक्कामोर्तब करेल. नव्या समितीचा कार्यकाळ 2022-2026 असा चार वर्षांचा असेल. अध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव, खजिनदार या एका पदासाठी प्रत्येकी एक अर्ज, चार उपाध्यक्षपदांसाठी चार अर्ज, तर पाच सदस्यपदांसाठी पाच अर्ज दाखल झाले आहेत.

जीओए सचिवपदी गुरुदत्त भक्ता आणखी एका मुदतीसाठी असतील हे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निश्चित झाले. खजिनदारपदासाठीही परेश कामत यांचाही एकमेव अर्ज आहे. मागील समितीतही या पदासाठी परेश बिनविरोध ठरले होते. जयेश नाईक व सिद्धार्थ सातार्डेकर यांना उपाध्यक्षपदी बढती असेल.

Shripad Naik
गोव्यासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, 'या' चार जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट

नव्या जीओए कार्यकारी समितीत 13 पैकी तिघी महिला असतील. फॅरेल फुर्तादो-ग्रासियस, अनघा वरळीकर व निशा मडगावकर यांचे सदस्यपदासाठी अर्ज आहेत. फॅरेल व अनघा मावळत्या समितीतही आहेत.

जीओए कार्यकारी समितीत चेतन कवळेकर, सुदेश ठाकूर व निशा मडगावकर हे तीन नवे चेहरे असतील. मावळत्या समितीतील उपाध्यक्ष गिरीश चोडणकर व लेनी डिगामा यांना पुन्हा अर्ज दाखल केलेला नाही.

अध्यक्ष (1 पद) : श्रीपाद नाईक (रायफल शूटिंग), उपाध्यक्ष (4 पदे) : आर. डी. मंगेशकर (तायक्वांडो), अर्विन सुवारिस (व्हॉलिबॉल), जयेश नाईक (वेटलिफ्टिंग), सिद्धार्थ सातार्डेकर (यॉटिंग), सचिव (1 पद) : गुरुदत्त भक्ता (ज्युडो), संयुक्त सचिव : चेतन कवळेकर (तिरंदाजी), खजिनदार : परेश कामत (अॅथलेटिक्स), सदस्य (5 पदे) : रुपेश महात्मे (हँडबॉल), फॅरेल फुर्तादो-ग्रासियस (हॉकी), सुदेश ठाकूर (जिम्नॅस्टिक्स), अनघा वरळीकर (तलवारबाजी), निशा मडगावकर (ट्रायथलॉन)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com