Shane Warne dainikgomantak
क्रीडा

मैदानावरील वॉर्नच्या शिस्तीचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला : स्वप्नील

वॉर्नच्या निधनामुळे फार दुःख झाले असून ही मी माझी वैयक्तिक हानी मानत

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याचा शैलीदार फलंदाज स्वप्नील अस्नोडकर महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याच्या नेतृत्व-मार्गदर्शनाखाली आयपीएल स्पर्धेत खेळला व सफलही ठरला. ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या मैदानावरील, ड्रेसिंग रुममधील शिस्तबद्ध वर्तणुकीचा आपल्यावर फार मोठा प्रभाव पडला, त्याच्या निधनामुळे फार दुःख झाले असून ही वैयक्तिक हानी मानतो, असे आपल्या माजी कर्णधारास श्रद्धांजली वाहताना स्वप्नीलने सांगितले. (Shane Warne's disciplined behavior on the field had a profound effect on me says Swapnil Asnodkar)

‘‘आयपीएलच्या (IPL) पहिल्या वर्षी वॉर्न (Shane Warne) याने माझ्या फलंदाजीतील नैसर्गिक आक्रमकता हेरली. त्याने प्रत्यक्ष मैदानावर खेळण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. भारतीय क्रिकेटमधील (Indian cricket) माझ्यासारख्या नवोदितासाठी वॉर्नसारख्या दिग्गज क्रिकेटपटूचे प्रोत्साहन लाख मोलाचे ठरले. वैयक्तिकदृष्‍ट्या मी ऑस्ट्रेलियन (Australia) क्रिकेटपटूचा अतीव ऋणी आहे,’’ असे स्वप्नीलने सांगितले. आयपीएलच्या पहिल्याच वर्षी २००८ साली वॉर्न याच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद मिळविले. त्यावेळी सलामीवीर स्वप्नीलच्या स्फोटक फलंदाजीने साऱ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर राजस्थान रॉयल्सतर्फे (Rajasthan Royals) स्वप्नील २००९, २०१० व २०११ मधील आयपीएल स्पर्धेत खेळला.

‘‘वॉर्न मैदानाबाहेर हॅप्पी गो लकी वृत्तीचे असला, तरी मैदानावर, तसेच ड्रेसिंग रूममध्ये अतिशय शिस्तबद्ध आणि वक्तशीर होता. संघाच्या बैठकीस ठरलेल्या वेळेपूर्वीच तो नियोजनासह हजर राहात असे. त्याच्या वर्तणुकीचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव पडला,’’ असे गोव्याचा माजी रणजी कर्णधार स्वप्नीलने नमूद केले. २००८ मध्ये आयपीएल स्पर्धेच्या मध्यास ब्रेक असताना राजस्थान रॉयल्सचे काही खेळाडू शेन वॉर्नसह स्वप्नीलच्या पर्वरी येथील निवासस्थानी आले होते. त्याची ती भेट अस्नोडकर कुटुंबीयांसाठी अविस्मरणीय होती, असेही स्वप्नीलने सांगितले.

गोवा... लव्हली प्लेस...

२००८ मधील आयपीएल स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) सर्व खेळाडूंची शेन वॉर्न याने शिबिरापूर्वी ओळख करून घेतली. त्यावेळी स्वप्नील अस्नोडकरचे आपण गोव्याचा (Goa) रहिवासी असल्याचे सांगितल्यावर, ‘‘ओह... गोवा... लव्हली प्लेस... फेमस फॉर बीचेस आणि पार्टीज...’’ असे वॉर्न उत्स्फूर्तपणे म्हणाल्याची आठवणही गोव्याच्या माजी क्रिकेटपटूने सांगितली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT