Sri Lanka Team Dainik Gomantak
क्रीडा

Sri Lanka Cricket: श्रीलंकेला मिळाला नवा कर्णधार! RCB चा माजी गोलंदाज सांभाळणार जबाबदारी

Pranali Kodre

श्रीलंका क्रिकेट संघाने शनिवारी (३० डिसेंबर) मोठी घोषणा केली आहे. श्रीलंकेने झिम्बाब्वे विरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे आणि टी२० मालिकांसाठी प्राथमिक संघाची घोषणा केली आहे. यातील टी२० मालिकेसाठी नव्या कर्णधाराचीही घोषणा केली आहे.

झिम्ब्बावेविरुद्ध श्रीलंका मायदेशात तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळणार आहे. या मालिकांना ६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यातील टी२० मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगाकडे श्रीलंकेच्या संघाने नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

हसरंगा ऑगस्टपासून श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये झालेल्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. त्याला आशिया चषक 2023 आणि वर्ल्डकप 2023 स्पर्धाही खेळता आली नाही.

वनिंदू हसरंगा गेल्या काही काळापासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. मात्र, २०२४ च्या लिलावात त्याला सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले.

दरम्यान, त्याच्यासह चरिथ असलंका झिम्ब्बावेविरुद्ध श्रीलंते टी20 संघाचा उपकर्णधार असेल. त्याचबरोबर वनडे संघाचे नेतृत्व कुशल मेंडिसलकडे असेल, तर वनडेतही उपकर्णधारपद असलंका सांभाळणार आहे.

दरम्यान, सध्या प्राथमिक संघ निवडण्यात आला असून काही दिवसातच अंतिम संघ निवडण्यात येईल.

झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंका संघात होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेतील सर्व सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत.

असा आहे श्रीलंका संघ

  • टी20 संघ - वानिंदू हसरंगा (कर्णधार), चारिथ असलंका (उपकर्णधार), पथुम निसंनका, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, दसून शनाका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तिक्षणा, कुसल परेरा, भानुका राजपक्षे, कमिंदू मेंडिस, दुनिख वेलालागे, अकिला धनंजया, जेफ्री वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना.

  • वनडे संघ - कुसल मेंडिस (कर्णधार), चरिथ असलंका (उपकर्णधार), पथुम निसंनका, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, सहान अरचिगे, नुवानिडू फर्नांडो, दसुन शनका, कामिंदू मेंडिस, चमिका करुणारत्ने, जेनिथ लियानागे, वानिंदु हसरंगा, महिश तिक्षणा, दिलशान मदुशंका, दुशंता चमीरा, दुनिथ वेलालागे, प्रमोद मदुशन, असिथा फर्नांडो, अकिला धनंजया, जेफ्री वांडरसे, चमिका गुणसेकेरा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT