Virat Kohli: विराटने द. आफ्रिकेत छोट्या RCB चाहत्याचा दिवस बनवला स्पेशल, Video व्हायरल

Virat Kohli Video: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान एका छोट्या चाहत्याचा दिवस विराट कोहलीने खास बनवला आहे.
Virat Kohli | RCB fan
Virat Kohli | RCB fanScreengrab/StarSportsKan

Virat Kohli signs young fan’s RCB Jersey During South Africa vs India Centurion Test watch Video:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या दक्षिण आफ्रिका आणि भारत संघात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डेला म्हणजेच 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियनला सुरू झाला आहे. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने त्याच्या एका चाहत्याचा दिवस खास बनवला आहे.

स्टार सोर्ट्सने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वीचा आहे.

Virat Kohli | RCB fan
Virat Kohli: 'मी विराटची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली नाही, तर...', गांगुलीचा खुलासा

या व्हिडिओमध्ये दिसते की सेंच्युरियनमधील मैदानाच्या बाउंड्री लाईनजवळ एक छोटा चाहता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएल संघाची जर्सी घेऊन उभा आहे. तिथे समालोचकही आहेत. यावेळी विराट येऊन त्या चाहत्याच्या हातात असलेल्या जर्सीवर एका संदेशासह स्वाक्षरी करतो.

हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनेही व्हिडिओ रिपोस्ट केला आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की 'तो (चाहता) आयुष्यभर हे जपून ठेवेल. कुठेही गेला तरी किंगकडे (विराट) चाहत्यांसाठी वेळ असतो.' विराट गेली 17 वर्षे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळतो.

Virat Kohli | RCB fan
SA vs IND: केएल राहुल द. आफ्रिकेला एकटा भिडला! सेंच्युरियनवर सेंच्युरी ठोकत केले 'हे' पराक्रम

सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघ सर्वबाद

सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. पण भारतीय संघ 67.4 षटकात 245 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून केएल राहुलने 101 धावांची शतकी खेळी केली.

तसेच विराट कोहलीने 38 धावांची खेळी केली, तर श्रेयस अय्यरने ३१ धावांची खेळी केली. या दोघांनी भारताने 24 धावांवर 3 विकेट्स गमावल्यानंतर 68 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला होता.

याशिवाय शार्दुल ठाकूरने 24 धावांची खेळी केली, तर यशस्वी जयस्वालने 17 धावा केल्या. याशिवाय कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आलेला नाही.

दक्षिण आफ्रिकेकडून या डावात कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच पदार्पणवीर नांद्र बर्गरने 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मार्को यान्सिन आणि गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com