Sri Lanka Cricket: श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! क्रीडामंत्र्यांची पदावरुन हकालपट्टी; म्हणाले, ''माझ्या जीवाला धोका...''

Sri Lanka Cricket: श्रीलंका क्रिकेटमध्ये गोंधळ सुरुच आहे. आयसीसीने निलंबित केल्यानंतरही तिथे काहीही चांगले होत नाहीये.
Roshan Ranasinghe
Roshan RanasingheDainik Gomantak
Published on
Updated on

Sri Lanka Cricket: श्रीलंका क्रिकेटमध्ये गोंधळ सुरुच आहे. आयसीसीने निलंबित केल्यानंतरही तिथे काहीही चांगले होत नाहीये. क्रिकेट प्रशासनातील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा खुद्द क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी आज (सोमवारी) केला.

त्यांना काही झाले तर अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि त्यांचे प्रमुख सल्लागार जबाबदार असतील, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अध्यक्ष विक्रमसिंघे यांनी त्यांना तात्काळ क्रीडामंत्री पदावरुन हटवले.

संसदेला संबोधित करताना रणसिंघे म्हणाले की, 'विक्रमसिंघे राजकीय सूडबुद्धीने माझ्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते खोट्या तथ्यांचा आधार घेत आहेत.' रणसिंघे पुढे सांगितले की, 'त्यांनी आयात केलेले एक वाहन अधिकाऱ्यांनी करात फेरफार करण्याच्या बहाण्याने जप्त केले.'

श्रीलंकेचे क्रिकेट प्रशासन चालवण्यासाठी अंतरिम समिती नेमण्याच्या आपल्या हालचालीचा संदर्भ देत रणसिंघे म्हणाले की, "क्रिकेटमधील (Cricket) भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल मला ही पोच पावती मिळाली आहे का? ऑडिट रिपोर्टच्या आधारे मी कारवाई केली.''

Roshan Ranasinghe
Sri Lanka Cricket: ICC ची मोठी कारवाई, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व निलंबित

केवळ भ्रष्टाचार (Corruption) उघड केला असताना अध्यक्ष राजकीय सूड का घेत आहेत, असा सवालही रणसिंघे यांनी केला. रणसिंघे पुढे म्हणाले की, "माझ्या जीवाला धोका आहे, आज किंवा उद्या मला मारले जाऊ शकते. मला काही झाले तर अध्यक्ष आणि त्यांचे सल्लागार सागला रत्नायके (राष्ट्रपती कार्यालयाचे प्रमुख) यांना जबाबदार धरले पाहिजे."

Roshan Ranasinghe
Sri Lanka Cricket: श्रीलंकन अष्टपैलूला 'ही' चूक पडली महागात, एक वर्षासाठी झाला निलंबित

दुसरीकडे, क्रीडामंत्र्यांच्या हकालपट्टीनंतर निलंबित श्रीलंका क्रिकेटला (एसएलसी) बळ मिळाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी सोमवारी एक निवेदन जारी करत म्हटले की, रणसिंघे यांना मंत्रिपदावरुन तात्काळ हटवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahkeem Cornwall T20 Double Century
Goa Assembly Election 2027
Sri Lanka Under-19 Cricket Scandal
Lowest Team Score in ODI
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com