Gareth Bale announces retirement Dainik Gomantak
क्रीडा

Gareth Bale Retires: स्टार फुटबॉलरचा वयाच्या 33 व्या वर्षीच करियरला 'फुलस्टॉप'! म्हणाला, 'खूप विचारपूर्वक आणि...'

Pranali Kodre

Gareth Bale Retires: फुटबॉल विश्वातून मोठी बातमी सोमवारी उशीरा मोठी बातमी समोर आली. वेल्सचा 33 वर्षीय फुटबॉलपटू गॅरेथ बेल याने क्लब आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. तो वेल्सच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होता.

बेलने वेल्ससाठी 111 सामने खेळले असून त्याने दोन युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये संघाचे नेतृत्वही केले. तो लॉस एंजेल्स, साउथँपटन, टॉटनहॅम आणि रिएल मद्रिद क्बलकडूनही खेळला आहे. तो शेवटचा स्पर्धात्मक सामना फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला.

(Wales footballer Gareth Bale announces retirement)

त्याने निवृत्तीची घोषणा करताना सोशल मीजियावर लिहिले, 'खूप विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक मी क्लब आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत आहे. मी खूप सुदैवी आहे की मला आवडत असलेला खेळ खेळण्याचे स्वप्न मला साकारता आले.'

'या खेळाने मला माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दिले. गेल्या 17 हंगांमातील या क्षणांची पुनरावृत्ती होणे अवघड आहे, मग माझ्यासाठी भविष्यात काहीही वाढून ठेवलेले असले तरी.'

बेलने रिएल मद्रीदसह पाचवेळा चॅम्पियन लीगचे विजेतेपद जिंकले. तसेच त्याने गेल्यावर्षी लॉस एंजेल्सकडून एमएलएस कप जिंकला.

त्याने क्बल्सबद्दल लिहिले की 'साउथँपटनमधील माझ्या पहिल्या सामन्यापासून लॉस एंजेल्ससाठीच्या शेवटच्या सामन्यापर्यंत माझी क्बल कारकिर्द ज्याप्रकारे झाली, त्याबद्दल मला अभिमान आणि कृतज्ञता आहे.'

याबरोबरच त्याने त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचेच आभारही मानले आहेत. त्याने लिहिले, माझ्या या प्रवासात ज्यांनी त्यांची भूमिका बजावली, त्या सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यत्त करतो. तुमच्याशिवाय हे अशक्य होते.'

'मी जेव्हा 9 वर्षांचा असताना खेळायला सुरुवात केल्यानंतर मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असा माझ्या कारकिर्दीला आकार देण्यासाठी आणि माझे आयुष्य बदलवण्यासाठी मला मदत केलेल्या लोकांचा मी नेहमीच ऋणी राहिल.'

त्याने खेळलेल्या लॉस एंजेल्स क्लबनेही त्याचे त्याच्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत. तसेट टॉटनहॅम क्लबनेही त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT