Julián Álvarez: फॅन्स की गर्लफ्रेंड? ब्रेकअपसाठीच्या पिटीशनने विश्वविजेत्या फुटबॉलरसमोर पेच

विश्वविजेत्या फुटबॉलपटूने त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप करावं म्हणून चक्क पिटीशनवर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.
Lionel Messi and Julian Alvarez
Lionel Messi and Julian AlvarezDainik Gomantak
Published on
Updated on

Julián Álvarez: एखाद्या खेळाडूला त्याच्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप करण्यासाठी चाहत्यांनी चक्क याचिकेवर स्वाक्षरी केल्याचे कधी ऐकले आहे का? पण हे खरे आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉल खेळाडू ज्युलियन अल्वारेज याने त्याची दीर्घकाळापासून असलेली गर्लफ्रेंड मारिया एमिलिया फेरेरो हिच्याबरोबर वेगळे होण्यासाठी तब्बल 20 हजारांहून अधिक चाहत्यांनी याचिकेवर स्वाक्षरी केल्या आहेत.

अर्जेंटिनाचा 22 वर्षीय अल्वारेजने गेल्यावर्षी झालेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये त्याच्या संघाला विजेतेपद जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने या स्पर्धेत 7 सामन्यात 4 गोल नोंदवले होते. तो शेवटपर्यंत गोल्डन बूटच्या शर्यतीतही होता.

दरम्यान, अर्जेंटिना हा फिफा वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. अशाच एका कार्यक्रमादरम्यान फेरेरोने अल्वारेजला युवा चाहत्यांबरोबर सेल्फी घेण्यापासून आणि त्यांना स्वाक्षरी देण्यापासून रोखले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.

चाहत्यांच्या नाराजीनंतर युट्यूब इनफ्लुएंसर असलेल्या फेरेरोने सोशल मीडियावर माफीही मागितली होती.

तिने म्हटले होते की 'आम्ही परत जाण्यापूर्वी ज्युली युवा चाहत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर ग्रुप फोटो काढण्यासाठी गेला होता, त्यामुळे सर्वांजवळ छान आठवण राहिल. मी फक्त सर्व व्यवस्थित होईल याचा प्रयत्न करत होते. पण जर माझी प्रतिक्रिया चांगली नसेल, तर मी माफी मागते. मला आशा आहे की तुम्ही समजून घ्याल.'

Lionel Messi and Julian Alvarez
Argentina: कल्ला होणारच! तब्बल 36 वर्षांनी वर्ल्डकप अर्जेंटिनात, पाहा राजधानीतील थक्क करणारी दृश्य

पण फेरेरोने केलेल्या कृतीने चाहते चांगलेच नाराज झाले असल्याने त्यांनी चक्क अल्वारेजने फेरेरोपासून वेगळे होण्यासाठी ऑनलाईन याचिकेवरच स्वाक्षरी केली. पण, सध्या तरी या याचिकेचा अल्वारेज आणि फेरेरो यांच्या नात्यावर काहीही परिणाम झालेला नाही. त्यांनी नवीन वर्षाचे स्वागतही एकत्र केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com