Virender Sehwag open up on approached by BCCI for Team India selector post : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही दिवसांपूर्वीच भारतीय पुरुष संघाच्या निवड समितीमधील रिक्त पद भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी काही माजी क्रिकेटपटूंची नावे समोर आली होती. यात विरेंद्र सेहवागचेही नाव होते. त्याने आता याबद्दल अपडेट दिली आहे.
निवड समीतीमध्ये फेब्रुवारीपासून एक जागा रिक्त आहे. फेब्रुवारीमध्ये स्टिंग ऑपरेशननंतर निवड समीतीच्या अध्यक्षपदावरून चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर शिव सुंदर दास यांना निवड समीतीचे प्रभारी अध्यक्षपद देण्यात आले होते.
तसेच सध्या निवड समितीमध्ये शिव सुंदर दास यांच्याशिवाय सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ हे सदस्य आहेत. पण अद्याप एक जागा रिकामी असल्याने या जागेसाठी 30 जूनपर्यंत बीसीसीआयने अर्ज करण्यास सांगितले आहे.
बीसीसीआयने अर्ज मागवल्यानंतर या जागेसाठी सेहवाग, गौतम गंभीर आणि युवराज सिंग, हरभजन सिंग अशा खेळाडूंची नावे समोर आली होती. मात्र, अर्ज करण्यासाठी एक निकष असाही आहे की खेळाडूंच्या निवृत्तीला 5 वर्षे पूर्ण झालेली असावीत, अशात युवराज, गंभीर, हरभजन या खेळाडूंची नावे बऱ्यापैकी मागे पडली.
पण सेहवागच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच असेही म्हटले जात होते की या पदासाठी बीसीसीआयनेही सेहवागशी संपर्क साधला आहे. मात्र त्याने टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्याने त्याला या पदासाठी कोणतीही ऑफर देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने निवड समितीतील पदासाठी अर्ज करण्यासाठी नियमावलीही जाहिर केली आहे.
बीसीसीआयने सांगितलेल्या पात्रता निकषानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कमीत कमी 7 कसोटी सामने खेळलेले असावेत किंवा 30 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत किंवा 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळलेलेल असावेत. त्याचबरोबर कमीत कमी 5 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.