Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

विराट कोहलीने बेंगळुरूसाठी केला खास 'विक्रम'

आयपीएल 2022 मध्ये आरसीबीच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहली त्याच्या जुन्या लयीत दिसून आला आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आरसीबीच्या (RCB) शेवटच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या जुन्या लयीत दिसून आला आहे. त्याने 54 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी खेळली आणि 'करो किंवा मरो'च्या सामन्यात आपल्या संघाला चॅम्पियन बनवले आहे. या उत्कृष्ट खेळीदरम्यान विराटने आरसीबीसाठी 7000 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा विराट पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कोणत्याही खेळाडूला एका संघासाठी इतक्या धावा करता आल्येल्या नाहीत. फ्रँचायझीसाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सुरेश रैना दुसऱ्या स्थानावरती आहे. रैनाने चेन्नईसाठी 5529 धावा केल्या आहेत. (Virat Kohli sets special record for Bangalore)

प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आरसीबीला गुजरातविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचाच होता. अशा परिस्थितीत विराटने आपल्या खांद्यावर संघाच्या विजयाची जबाबदारी घेतली आणि या मोसमातील आपली सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. या हंगामात त्याच्या बॅटमधून फक्त अर्धशतके झाली आहेत आणि दोघेही गुजरातविरुद्ध आले आहेत.

आरसीबीसाठी 7000 हजारांहून अधिक धावा करणाऱ्या विराटनंतर एबी डिव्हिलियर्सचे नाव लिस्ट मध्ये आहे. डीव्हिलियर्सने आरसीबीसाठी 4522 धावा केल्या. त्याचवेळी ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावरती आहे. गेलने 3420 धावा केल्या. मात्र, विराटशी बरोबरी साधणे कोणत्याही फलंदाजासाठी खूप अवघड असणार आहे. विराटने आयपीएलच्या चॅम्पियन्स लीगमध्येही आरसीबीसाठी फलंदाजी केली आहे आणि या लीगमध्येही त्याने धावा केल्या आहेत. आता ही लीग बंद झाली आहे.

विराट हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे

विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत 221 सामन्यांच्या 213 डावांमध्ये 6592 रन्स् केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने 5 शतके आणि 44 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सरासरी 36.42 आणि स्ट्राइक रेट 129.33 एवढी आहे. आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 113 एवढी धावा आहे. IPL 2016 मधील विराटची कामगिरी सर्वात नेत्रदीपक होती, जेव्हा त्याने एका सत्रात चार शतके आणि 973 रन्स् केल्या होत्या. या मोसमात विराटचा संघही अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र हैदराबादकडून विजेतेपदाचा सामना यावेळी गमावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT