Dean Elgar 
क्रीडा

Dean Elgar: कारकिर्दीचा शेवट पराभवाने! भारत-द.आफ्रिकाने एल्गारला दिला भावूक निरोप, फोटो व्हायरल

South Africa vs India: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात केपटाऊनमध्ये खेळवण्यात आलेला कसोटी सामना डीन एल्गारचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

Pranali Kodre

Dean Elgar Last Test Match:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनला पार पडला. या सामन्यात भारताने गुरुवारी (4 जानेवारी) 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दरम्यान, हा सामना दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू डीन एल्गारचा अखेरचा सामना ठरला.

एल्गारने या सामन्यात नियमित कर्णधार तेंबा बाऊमाच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपदही सांभाळले होते. मात्र, त्याच्या अखेरच्या कसोटीत त्याला कर्णधार म्हणूनही पराभवाचा सामना करावा लागला. तसेच त्याला फलंदाजीतही खास काही करता आले नाही. त्याने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 12 धावा केल्या.

असे असले तरी या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने केलेल्या 185 धावांच्या खेळीमुळे त्याने दक्षिण आफ्रिकेला डावाने मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललेला होता. त्यामुळे त्याला केपटाऊन कसोटीनंतर जसप्रीत बुमराहसह संयुक्तरित्या मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

विराट - रोहितकडून भेट

दरम्यान, सामन्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एल्गारला स्वाक्षरी केलेली त्याची जर्सी भेट दिली. त्याचबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही सर्व भारतीय संघाने स्वाक्षरी केलेली जर्सी एल्गारला प्रदान केली.

इतकेच नाही, तर जेव्हा एल्गार दुसऱ्या डावात बाद होऊन परत जात होता, तेव्हा भारतीय संघाने त्याचे अभिनंदनही केले.

एल्गार भावूक

36 वर्षीय एल्गार हा सामना संपल्यानंतर भावूक झाला होता. त्याने सामन्यानंतर असेही म्हटले की हा शानदार प्रवास होता.

गेल्या 12 वर्षापासून तो दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेट खेळत आहे. तसेच कसोटीमधील तो दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक राहिला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचे कसोटी नेतृत्वही केले आहे. दरम्यान, त्याचा सन्मान म्हणून दक्षिण आफ्रिकेने तेंबा बाऊमाच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे शेवटच्या सामन्यासाठी कर्णधारपदही सोपवले होते.

तसेच, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी उतरले, तेव्हा त्यांनी एल्गारला मानवंदना दिली होती.

एल्गारने आत्तापर्यंत 86 कसोटी सामन्यात 37.92 च्या सरासरीने 5347 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 8 वनडे सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने 104 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

एल्गारने 18 कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना 9 सामने जिंकले आणि 8 सामने पराभूत झाले, त्याचबरोबर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT