Virat Kohli | MS Dhoni
Virat Kohli | MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: जेव्हा विमानात भेटलेल्या धोनीच्या फॅनची कोहलीने घेतलेली शाळा, स्वत: केला मोठा खुलासा

Pranali Kodre

Virat Kohli revealed a funny incident from a flight: कोणत्याही खेळातील खेळाडूंना विविध ठिकाणी स्पर्धा होत असल्याने अनेकदा प्रवास करावा लागतो. भारतीय क्रिकेटपटू तर सातत्याने प्रवास करत असतात. या प्रवासांदरम्यान अनेक अनुभवही त्यांना येत असतात. असाच एक गमतीशीर अनुभव विराट कोहलीने सांगितला आहे.

विराटने साल 2014 च्या दरम्यानचा विमानात भेटलेल्या एका चाहत्याचा अनुभव रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या पॉडकास्टमध्ये सांगितला आहे. हा चाहता एमएस धोनीचा चाहता असल्याचेही विराटने सांगितले आहे. तसेच ज्यावेळी तो भेटला होता, त्यावेळी विराट चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्यामुळे तो चाहता त्याला चांगला खेळण्याबद्दल सांगत असताना त्याला कशाप्रकारे धडा शिकला, याबद्दलही खुलासा विराटने केला.

विराटने सांगितले की 'आम्ही कोचीतून दिल्लीकडे येणाऱ्या विमानातून प्रवास करत होतो. भारतीय संघाला पुढच्या बाजूचे सिट्स देण्यात आले होते. त्यावेळी एमएस धोनीचा एक चाहता आत आला. तो चेन्नईचा होता. तो एमएस धोनीला भेटला. त्यावेळी तो खूपच उत्साहात होता. पण मग तो संघाच्या कॉम्बिनेशनबद्दल आणि नेतृत्वाबद्दल धोनीला सल्ले द्यायला लागला. पण धोनीने शांत बसून सर्व ऐकून घेतले.'

विराटने पुढे सांगितले, 'त्यानंतर तो परत त्याच्या सिटकडे जात होता आणि त्याला मी दिसलो, त्यावेळी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, कोहली काय सुरू आहे? तुझ्या बॅटिंगला काय झालंय? ही घडना साधारण 2014 सालच्या दरम्यानची असेल. मी त्याकाळात फार धावा केल्या नव्हत्या आणि काही वनडे सामन्यांमध्ये स्वस्तात बाद झालो होतो.'

'त्यावेळी मी त्याला म्हणालो की माझ्याकडून गेल्या काही दिवसात चांगल्या धावा नाही झाल्या. त्यावर तो मला म्हणाला, हो माहित आहे आणि मला पुढच्या सामन्यात तुझ्याकडून शतक हवे आहे.'

'हे ऐकल्यानंतर मात्र माझ्या डोक्यात गेलं. मी खूपच युवा होता. मी त्याला विचारलं की तो कोणत्या कंपनीत काम करतो, कोणत्या पदावर काम करतो. त्यानंतर मी त्याला म्हटलं की मला तू तीन महिन्यात तूझ्या कंपनीचा चेअरमन होऊन दाखव. त्यानंतर तो मला म्हणाला की कसं शक्य आहे.'

विराटने पुढे असेही सांगितले, 'त्यावेळी मी त्याला हे समजवायचा प्रयत्न करत होतो की मी सुद्धा चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण हा काही व्हिडिओ गेम नाही. मी चांगलं खेळण्यासाठी प्रयत्न करू शकतो, पण अपेक्षांचे ओझे टाकू नका. त्याला नंतर ते समजले.'

'त्याचवेळी संघातील इतर खेळाडू अचानक कोच...कोच... असं ओरडायला लागले. कारण तो चाहता सर्वांना सल्ले देत होता. पण त्यावेळी त्या चाहत्यानेही हे गंमत म्हणून स्विकारले आणि तो पण हसायला लागला. हे खूप मजेशीर अंदाजात सर्व झाले. नंतर तो त्याच्या जागेवर बसायला निघून गेला.'

दरम्यान, विराटने या पॉडकास्टमध्ये अनेक विषयांवर भाष्य केले. त्याने धोनीबद्दल आदर व्यक्त करताना सांगितले की त्याच्या प्रशिक्षक आणि कुटुंबाव्यतिरिक्त फक्त धोनी होता, ज्याने त्याच्या वाईट काळात त्याच्याशी संपर्क साधला होता. तसेच विराटने असेही सांगितले की तो खूप भाग्यशाली आहे की तो २०११ सालच्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT