Virat Kohli & Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड मोडताना तुला कसे वाटेल? किंग कोहली म्हणाला...

Virat Kohli: विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले असले तरी सचिन तेंडुलकर आणि त्याच्या विक्रमांची तुलना अनेकदा झाली आहे.

Manish Jadhav

Virat Kohli: विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले असले तरी सचिन तेंडुलकर आणि त्याच्या विक्रमांची तुलना अनेकदा झाली आहे. विराट यावर कधीच उघडपणे बोलला नसला तरी आता त्याने या चर्चेवर मौन सोडले आहे.

हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण असेल

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली म्हणाला की, सचिन तेंडुलकरचा 49 वनडे शतकांचा विक्रम मोडणे हा त्याच्यासाठी 'भावनिक क्षण' असेल.

'लिटिल मास्टर' सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एकदिवसीय सामन्यांच्या 452 डावांमध्ये 49 शतके झळकावली आहेत.

कोहलीच्या नावावर यापूर्वी 265 डावांमध्ये 46 वनडे शतके आहेत. तो इतिहास रचण्यापासून 4 शतके दूर आहे.

सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेल्या कोहलीला जेव्हा विचारले गेले की, तो टप्पा गाठल्यानंतर कसे वाटेल, यावर विराट म्हणाला की, "हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण असेल."

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 शतके

कोहलीने आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 शतके झळकावली आहेत. ज्यामध्ये 46 वनडे, 28 कसोटी आणि एक टी-20 शतकांचा समावेश आहे.

विराट सध्या आयपीएल (IPL) 2023 16 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून खेळत आहे, जिथे त्याने 6 अर्धशतकांच्या मदतीने 11 डावांमध्ये 420 धावा (पाचव्या क्रमांकावर) केल्या आहेत. 242 डावात 12,000 वनडे धावा करणारा तो सर्वात वेगवान खेळाडू आहे. या प्रकरणात त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT