Virat Kohli Video: आधी आशिर्वाद मग बाकी सर्व...! बालपणीच्या कोचला पाहून विराट भावूक; जिंकली करोडोंची मनं!

Video: दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहली त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकांना भेटला.
Virat Kohli with Coach
Virat Kohli with CoachDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Touches feet of his childhood coach: इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये शनिवारी (6 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामना होत आहे. हे मैदान बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे घरचे मैदान आहे. दिल्लीतच लहानाचा मोठा झालेला विराट या मैदानावर अनेक सामने खेळला आहे.

दरम्यान, हा सामना सुरू होण्यापूर्वी तो याच मैदानावर त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनाही भेटला. राजकुमार शर्मा यांनी विराटला क्रिकेटपटू म्हणून पैलू पाडण्यासाठी मोठी भूमिका निभावली आहे. त्यामुळे विराटही नेहमीच त्याच्या प्रशिक्षकांबद्दल आदराने बोलतो. तसेच त्यांना मोठा सन्मानही देतो.

Virat Kohli with Coach
IPL 2023: दिल्लीचा स्टार बॉलर अचानक मायदेशी रवाना, तर लखनऊमध्ये केएल राहुलची जागा घेणार 'त्रिशतकवीर'

नुकतेच याची प्रचिती सर्वांनाच आली. दिल्ली विरुद्धच्या सामन्यापूर्वी जेव्हा विराट राजकुमार शर्मा यांना भेटला, तेव्हा तो सर्वात आधी त्यांच्या पाया पडला आणि मग त्याने त्यांच्याशी चर्चा करायला सुरूवात केली. विराटच्या या कृतीने करडो चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचे याबद्दल कौतुकही होत आहे.

तसेच हा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर करण्यात आला असून या व्हिडिओलाही मोठी पसंती दिली जात आहे. त्यावर अनेक युजर्सने विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Virat Kohli with Coach
'सहन करणार नसाल तर...', भांडणानंतर RCB ड्रेसिंग रुमधील इनसाईड Video व्हायरल

विराटने पूर्ण केल्या 7000 धावा

दरम्यान, विराटने शनिवारी दिल्लीविरुद्ध शानदार खेळही केला. विराटने 46 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार मारले. याच खेळीदरम्यान विराटने आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये 7000 धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा कोणालाही करता आलेला नाही. 

त्याच्याशिवाय महिपाल लोमरोरनेही बेंगलोरसाठी अर्धशतकी खेळी केली. त्याने 29 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याचबरोबर कर्णधार फाफ डू प्लेसिसने 32 चेंडूत 45 धावांची खेळी केली. त्यामुळे बेंगलोरने 20 षटकात 4 बाद 181 धावा उभ्या केल्या.

दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय खलील अहमद आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com