Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

'विराट कोहलीच टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार'

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारताने मुंबई कसोटी 372 धावांनी जिंकली, हा त्याचा धावांच्या दृष्टीने सर्वात मोठा विजय होता.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी टीम इंडियाची (Team India) निवड कोणत्याही क्षणी होऊ शकते. परंतु, त्याआधी विराट कोहलीच्या (Virat Kohli) कर्णधारपदाबद्दल एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. हे विधान भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) याने केले आहे, ज्याने विराट कोहलीला कसोटीतील सर्वोत्तम कर्णधार म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) कसोटी मालिकेतील विजयानंतर इरफान पठाण म्हणाला की, "कसोटी क्रिकेटमधील विराट कोहली हा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार आहे."

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मुंबई कसोटी 372 धावांनी जिंकली, हा त्याचा धावांच्या दृष्टीने सर्वात मोठा विजय होता. या शानदार विजयासह भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेवरही कब्जा केला. भारताच्या मालिका विजयानंतर इरफान पठाणने ट्विटरद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. त्याला कसोटीतील भारताचा सर्वोत्तम कर्णधार म्हणून वर्णन केले.

तसेच, आपल्या ट्विटमध्ये इरफान पठाणने भारताच्या दोन यशस्वी कसोटी कर्णधारांमधील विजयाच्या टक्केवारीतील फरकही सांगितला आहे. त्याने लिहिले की, विराट कोहलीची कसोटीतील विजयाची टक्केवारी 59.09 आहे. सध्याच्या कसोटी कर्णधारांमध्ये विजयाच्या बाबतीतही विराट पहिला आहे, ज्याने किमान 10 कसोटींमध्ये कर्णधारपद भूषवले आहे.

आता विराटच्या निशाण्यावर दक्षिण आफ्रिका

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजय हा भारताचा गेल्या 8 वर्षांत मायदेशातील सलग 14 वा कसोटी मालिका विजय आहे. भारतीय संघाने 2013 पासून घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. यामध्ये भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक सामने जिंकले आहेत. विराट कोहलीची नजर आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर तो म्हणाला की, दक्षिण आफ्रिका दौरा आमच्यासाठी मोठे आव्हान असेल. आम्ही तिथे अजून एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. यावेळी आम्हाला संधी आहे. आत्तापर्यंत जे केले नाही ते आम्हाला तिथे करायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

SCROLL FOR NEXT