IND vs SA: भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या

T20 आणि कसोटी मालिकेत न्यूझीलंडला (New Zealand) पराभूत केल्यानंतर, आता टीम इंडियाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका (India vs South Africa Schedule) आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

T20 आणि कसोटी मालिकेत न्यूझीलंडला (New Zealand) पराभूत केल्यानंतर, आता टीम इंडियाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका (India vs South Africa Schedule) आहे. जिथे त्यांना एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळायची आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी मुंबईत आठवडाभराचे शिबिर होणार असून त्यासाठी टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खेळाडूंना मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या तयार करणार आहेत. यापूर्वी टीम इंडिया ( Team India) दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार होती, परंतु तिथे कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron variant) प्रसार झाल्यामुळे टी-20 मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे नवे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले.

भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या नव्या वेळापत्रकानुसार टीम इंडिया बॉक्सिंग डेला सेंच्युरियनमध्ये कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर 2022 चा पहिला सामना जोहान्सबर्गमध्ये होईल आणि त्यानंतर कसोटी मालिकेतील तिसरा सामना केपटाऊनमध्ये होईल. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने पार्ल येथे खेळवले जातील. शेवटचा सामना केपटाऊनमध्ये होणार आहे.

Virat Kohli
न्यूझीलंडविरुध्द कसोटी मालिका जिंकूनही टीम इंडियापुढे संघनिवडीचा पेच...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वेळापत्रक

तीन सामन्यांची कसोटी मालिका

पहिली कसोटी - 26-30 डिसेंबर, सेंच्युरियन, वेळ-1.30 तास

दुसरी कसोटी- जानेवारी 03-07, जोहान्सबर्ग, वेळ-1.30 वा

तिसरी कसोटी- 11-15 जानेवारी, केपटाऊन वेळ-2.00 वा

तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका

पहिली एकदिवसीय - 19 जानेवारी, पर्ल, वेळ - दुपारी 2.00 वाजता

दुसरी वनडे - 21 जानेवारी, पर्ल, वेळ - दुपारी 2.00 वाजता

तिसरी एकदिवसीय - 23 जानेवारी, केपटाऊन, वेळ - दुपारी 2.00 वाजता

भारतीय संघाची लवकरच घोषणा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची मंगळवारी घोषणा होऊ शकते. भारतीय निवड समिती मुंबईत असून बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी संघात अजिंक्य रहाणेबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाला रहाणे संघात हवा आहे, परंतु आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे कठीण आहे. त्यामुळे रोहित शर्माकडे कसोटी उपकर्णधारपद सोपवले जाऊ शकते, असे मानले जात आहे. चेतेश्वर पुजाराचा पर्याय म्हणून इंडिया-अ चे खेळाडूही शर्यतीत आहेत. ज्यामध्ये प्रियांक पांचाळ, हनुमा विहारी यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतून इशांत शर्माचे पत्ते कापले जाऊ शकतात. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही, त्यामुळे निवडकर्ते या दौऱ्यासाठी संघ निवडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com