Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Income: सोशल मीडियावरील एक पोस्ट विराटला बनवते 'मालामाल'

Virat Kohli: विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 211 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

दैनिक गोमन्तक

Virat Kohli Income: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 211 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स असलेला विराट कोहली हा पहिला भारतीय आहे. हॉपरच्या 2022 इन्स्टाग्राम रिच लिस्टनुसार, विराटला प्रायोजित पोस्टमधून सुमारे 8.69 कोटी रुपये मिळतात. इन्स्टाग्रामवरुन कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत विराट 14 व्या क्रमांकावर आहे. फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी सुमारे 150 मिलियन चार्ज करतो.

रिपोर्टनुसार, विराटने 2020 मध्ये फेसबुकवरील एका पोस्टमधून सुमारे 2.5 कोटी रुपये कमावले होते. त्यावेळी त्याचे फॉलोअर्स 34 दशलक्ष होते, जे आता 49 दशलक्ष झाले आहेत. त्यामुळे त्याच्या कमाईचा आकडाही खूप मोठा झाला आहे. विराट कोहलीचे (Virat Kohli) ट्विटर अकाऊंट आता भारतातील (India) तिसरे सर्वाधिक फॉलोअर्स असणारे आकाऊंट बनले आहे. त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स फक्त पीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवर आहेत.

विराट कोहलीच्या ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या फॉलोअर्सची एकूण संख्या 310 दशलक्ष म्हणजेच 31 कोटींच्या पुढे गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT