ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand Semi-Final, Virat Kohli 50th Century:
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी (15 नोव्हेंबर) खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक ठोकले आहे.
विराटचे हे 50 वे वनडे शतक आहे. त्यामुळे तो 50 वनडे शतके ठोकणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकाच्या विक्रमाला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे हा सामना पाहाण्यासाठी सचिनही स्टेडियममध्ये उपस्थित होता.
50 शतके - विराट कोहली (291 सामने)
49 शतके - सचिन तेंडुलकर (463 सामने)
31 शतके - रोहित शर्मा (261 सामने)
30 शतके - रिकी पाँटिंग (375 सामने)
28 शतके - सनथ जयसूर्या (445 सामने)
विराटने हे शतक 106 चेंडूत पूर्ण केले. त्याचे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील तिसरे शतक आहे. त्यामुळे त्याचे आता वनडे वर्ल्डकपमध्ये एकूण 5 शतके झाली आहेत. त्याचमुळे तो रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतर वर्ल्डकपमध्ये 5 शतके करणारा तिसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितने 7 शतके, तर सचिनने 6 शतके वनडे वर्ल्डकरमध्ये केली आहेत.
वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके -
7 - रोहित शर्मा
6 - सचिन तेंडुलकर
6 - डेव्हिड वॉर्नर
5 - रिकी पाँटिंग
5 - कुमार संगकारा
5 - विराट कोहली
दरम्यान, विराटने वनडे वर्ल्डकरमध्ये 700 धावांचा टप्पाही पार केला आहे. एकाच वर्ल्डकप स्पर्धेत 700 हून अधिक धावा करणारा विराट पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी कोणालाही एकाच वर्ल्डकप स्पर्धेत 700 पेक्षा अधिक धावा करता आल्या नव्हत्या.
यापूर्वी एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 2003 सालच्या वर्ल्डकप स्पर्धेत 11 सामन्यांत 673 धावा केल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.