Virat Kohli Had Given A Gift To Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

विराटने दिलेली भेट मास्टर ब्लास्टरने तेंडूलकरने का परत केली?

सचिन जेव्हा निवृत्त झाला तेव्हा विराटने एक खास भेट सचिनला दिली होती. पण 'महान क्रिकेटपटूने' ते काही काळ आपल्याजवळ ठेवून परत केले होते.

दैनिक गोमन्तक

जगातील महान क्रिकेटरपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) निवृत्ती घेतली तेव्हा त्याचे लाखो चाहते भावूक झाले होते. सचिनने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना 2013 ला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती (Mumbai Wankhede Stadium) खेळला होता. या सामन्यानंतर ज्या क्रिकेटपटूने त्याला आपल्या खांद्यावरती बसवुन फिरवणाऱ्याचे नाव विराट कोहली आहे, ज्याची गणना दिग्गज फलंदाजांमध्येही केली जाते. सचिन जेव्हा निवृत्त झाला तेव्हा विराटने त्याला एक खास भेट सचिनला दिली होती, पण 'क्रिकेटच्या देवाने' ते काही काळ आपल्याजवळ ठेवून परत केले होते. (Virat Kohli Had Given A Gift To Sachin Tendulkar)

24 वर्षे भारतीय क्रिकेटचे (Indian cricket) प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिन तेंडुलकरने स्वतः ही संपूर्ण कहाणी माध्यमांना सांगितली आहे. सचिनने सांगितले की, जेव्हा सर्वजण भावूक झाले होते तेव्हा विराटने त्यांना एक खास भेट दिली होती. ती भेट म्हणजे एक पवित्र धागा, जो विराटच्या वडिलांचीही खूण होती. सचिनने तो धागा काही काळ सोबत ठेवला पण नंतर तो विराटला परत केला.

याबाबत ग्राहम बेनसिंगरशी (Graham Bensinger) बोलताना सचिन म्हणाला की, 'मी एका कोपऱ्यात डोक्यावर टॉवेल बांधून डोळे पुसत बसलो होतो, मी खरच भावूक झालो होतो. त्यानंतर विराट माझ्याकडे आला आणि त्याच्या वडिलांनी त्याला भेट म्हणून दिलेला पवित्र धागा त्याने मला दिला. सचिन म्हणाला की तो धागा त्याच्यासाठी अनमोल असल्यामुळे त्याने विराटला परत केला.

48 वर्षीय सचिन म्हणाला, 'मी तो धागा काही काळ माझ्याजवळ ठेवला आणि नंतर विराटला परत केले. तो अमूल्य आहे आणि ते तुमच्याकडेच राहिले पाहिजे, इतर कोणाकडे नाही. हा तुझा वारसा आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तो तुमच्यासोबतच राहिला पाहिजे. मी ती भेट परत केली. तो आमच्या दोघांसाठीही एक भावनिक क्षण होता, जो कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहील.

सचिनला क्रिकेट (Cricket) रेकॉर्ड्सचा बादशाह म्हटले जाते. विराटसह अनेक क्रिकेटपटूंसाठी तो आदर्श मानला जातो. सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके आहेत, तसेच तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा देखील फलंदाज आहे. त्याने 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2013 पर्यंत तो टीम इंडियाकडून खेळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT