Nanda Lolayekar Cricket Cup
Nanda Lolayekar Cricket CupDainik Gomantak

माशेत होणार 40व्या नंदा लोलयेकर चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना

स्पर्धेत राज्यातील गोवा क्रिकेट असोसिएशनशी सलंग्न एकूण चौदा संघानी भाग घेतला होता.
Published on

काणकोण: माशे क्रिकेट क्लब आयोजीत 40व्या नंदा लोलयेकर स्मृती सिजन बाॅल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (ता.20) सकाळी 10 वाजता श्री निराकार मैदान माशे येथील जीसीएने नविन बनविलेल्या टर्फ पिचवर होणार आहे.आर्लेम क्रिकेट क्लब (Nanda Lolayekar Cricket Cup) मडगाव व विजय स्पोर्टस क्लब, मडगाव यांच्यात हा सामना होईल.

Nanda Lolayekar Cricket Cup
सचिन तेंडुलकर गुपचूप पाहतो अर्जुनचा खेळ, जाणून घ्या कारण

स्पर्धेत राज्यातील गोवा क्रिकेट असोसिएशनशी (Goa Cricket Association) सलंग्न एकूण चौदा संघानी भाग घेतला होता. उपांत्य सामन्यात आर्लेम क्रिकेट संघाने पोळे क्रकेट संघाचा 82 धावानी पराभव करुन व विजय स्पोर्ट्स कल्बने यंग स्टार्स ऑफ मौला संघाचा सहज पराभव करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

Nanda Lolayekar Cricket Cup
IPL 2022 पूर्वी सनरायझर्स हैदराबादला बसला मोठा धक्का

अंतीम सामन्यानंतर संध्याकाळी 4 वाजता अंतिम सामन्याचा बक्षिस वितरण समारंभ होणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे प्रसिद्ध फुटबाॅलपटू व भारतीय फुटबॅाल संघाचे माजी कॅप्टन पद्मश्री ब्रम्हानंद शंखवाळकर उपस्थित रहाणार आहेत.तसेच स्पर्धेचे आश्रयदाते चिराग नायक,जीसीएचे सेक्रेटरी विपुल फडके व निराकार एज्युकेशन सोसाटीचे चेअरमन प्रशांत नाईक यांची उपस्थिती राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com