Virat Kohli 
क्रीडा

IND vs NZ Semi-Final: मैदानात उतरताच कोहलीचा नवा कारनामा! कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला विक्रम

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand Semi-Final, Virat Kohli Record:

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असेलला हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी खास आहे.

विराट तब्बल चौथ्यांदा वनडे वर्ल्डकपचा उपांत्य सामना खेळत आहे. त्यामुळे तो चार वनडे वर्ल्डकपचे उपांत्य सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणालाही असा कारनामा करता आलेला नाही.

विराटने यापूर्वी 2011 वर्ल्डकप, 2015 वर्ल्डकप आणि 2019 वर्ल्डकप अशा तीन वनडे वर्ल्डकपमध्ये उपांत्य सामना खेळला आहे. विशेष म्हणजे विराट त्याच्या कारकिर्दीत चार वनडे वर्ल्डकप खेळला असून चारही सामन्यात त्याला उपांत्य सामना खेळण्याचा अनुभव आहे.

मात्र, असे असले तरी त्याची उपांत्य सामन्यातील कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. विराटने 2011 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेला उपांत्य सामना खेळला होता. त्यावेळी तो 9 धावांवर बाद झाला होता. त्याला वहाब रियाझने बाद केले होते. त्यानंतर 2015 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उपांत्य सामना झाला होता.

या सामन्यात विराटला अवघ्या एका धावेवर मिचेल जॉन्सनने बाद केले होते, तर 2019 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच भारताचा उपांत्य सामना झाला होता. त्या सामन्यातही विराटला एक धावेवर ट्रेंट बोल्टने बाद केले होते. दरम्यान, आता चौथ्या उपांत्य सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विराटने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत 9 सामन्यांत 99 च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत. यात 2 शतकांचाही समावेश आहे. तो या स्पर्धेत सध्या सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे.

पहिल्या उपांत्य सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटेनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT