Rohit Sharma: ...अन् धोनीची भविष्यवाणी रोहितने काही मिनिटाच खरी करत ठोकल्या तब्बल 264 धावा

Rohit Sharma Double Century: रोहित शर्माने 9 वर्षांपूर्वी 264 धावांची खेळी केली होती, त्यावेळी धोनीने काही खास ट्वीट केले होते.
MS Dhoni | Rohit Sharma
MS Dhoni | Rohit SharmaDainik Gomantak

MS Dhoni Tweet during Rohit Sharma 264 runs inning against Sri Lanka at Kolkata on 13th November 2014 :

भारताचा कर्णधार रोहित शर्माने आत्तापर्यंत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्याने वनडेत तब्बल 3 द्विशतके करण्याचाही पराक्रम केला आहे. त्यातील एक खास द्विशतक त्याने बरोबर 9 वर्षांपूर्वी केले होते.

9 वर्षांपूर्वी म्हणजेच 13 नोव्हेंबर 2014 साली रोहित शर्माने त्याच्या वनडे कारकिर्दीतील दुसरे द्विशतक केले. हे द्विशतक विश्वविक्रमी ठरले. त्याने हे द्विशतक श्रीलंकेविरुद्ध ईडन गार्डन्स, कोलकाता येथे केले होते.

या सामन्यात संयमी सुरुवात केली होती, पण अखेरीस त्याने ताबडतोड फलंदाजी करत 173 चेंडूत 264 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने तब्बल 33 चौकार आणि 9 षटकार मारले होते. ही वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावांची वैयक्तिक खेळी देखील आहे.

MS Dhoni | Rohit Sharma
World Cup 2023: 'आम्ही काहीही केलं तरी...', नेदरलँड्सविरुद्ध टॉस जिंकून रोहितचं मोठं भाष्य

श्रीलंकेविरुद्ध भारताने प्रथम फलंदाजी केली होती. त्या सामन्यात भारताचा तत्कालीन नियमित कर्णधार एमएस धोनीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे विराट कोहली नेतृत्व करत होता. यावेळी रोहितबरोबर सलामीला फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेची विकेट लवकर पडली होती. त्यानंतर अंबाती रायुडूही स्वस्तात बाद झालेला.

पण नंतर रोहित आणि विराट यांची जोडी जमली. एका बाजूने स्थिरावलेल्या रोहित शर्माने फटकेबाजीला सुरुवात केली, तर विराटने त्याला दुसऱ्या बाजूने संयमी साथ दिली. रोहितने 125 चेंडूत दीडशे धावा केल्यानंतर विराट 66 धावांवर बाद झाला. विराट आणि रोहित यांच्यात 201 धावांची भागीदारी झाली.

त्यानंतर मात्र रोहितने टॉप गिअर घेतला आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, तो पुढच्या 28 चेंडूत 200 धावांपर्यंत पोहचला. याचदरम्यान रोहित 200 धावांच्या आसपास असताना एमएस धोनीने दोन ट्वीट केले होते, ज्यात त्याने रोहित आडीचशे धावा करेल, अशी भविष्यवाणीही केली होती.

MS Dhoni | Rohit Sharma
Rohit Sharma: 'रोहितला करायची नव्हती टीम इंडियाची कॅप्टन्सी, पण मग...', गांगुलीचा मोठा खुलासा

रोहित ही खेळी करत असतानाच आधी धोनीने ट्विट केले की 'रोहित खूपच चांगली फलंदाजी केली. हाच खरा रोहित आहे. प्रचंड प्रतिभा असलेला. दर्जेदार खेळाचे साक्षीदार व्हा आणि मजा घ्या.'

त्यानंतर काही मिनिटातच धोनीने दुसरे ट्वीट केले. त्याने लिहिले की 'जर रोहित आज बाद झाला नाही, तर तो नक्कीच 250 धावांचा टप्पा आज तो पूर्ण करणार.'

विशेष म्हणजे झालंही तसंच. धोनीच्या या ट्वीटनंतर काही वेळातच रोहितने 250 धावांचा टप्पा पार केला. त्याने 200 धावांनंतर पुढच्या धावा अवघ्या 20 चेंडूत काढल्या. त्यामुळे धोनीने केलेली भविष्यवाणी खरी ठरली. धोनीने ट्वीटरवर केलेल्या कौतुकाबद्दल रोहितने नंतर त्याचे आभारही मानले होते.

या सामन्यात रोहित डावातील अखेरचा चेंडू बाकी असताना नुवान कुलसेखराने त्याला बाद केले. त्याचा झेल माहेला जयवर्धनेने घेतला. त्यामुळे रोहितची ही विश्वविक्रमी खेळीला अखेर ब्रेक लागला. पण त्याच्या या खेळीमुळे भारताने 50 षटकात 5 बाद 404 धावा केल्या होत्या.

त्यानंतर 405 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 43.1 षटकात 251 धावांवर सर्वबाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com