Virat Kohli Instagram/indiancricketteam
क्रीडा

IND vs AFG: चेस मास्टर! विराटची 29 धावांची खेळीही ठरली विक्रमी, 'हा' रेकॉर्ड करणारा पहिलाच भारतीय

Virat Kohli: विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 29 धावांची खेळी करण्याबरोबरच एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

India vs Afghanistan, 2nd T20I match at Indore, Virat Kohli Record:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात रविवारी टी20 मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

याच सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

विशेष म्हणजे विराटने या सामन्यातून 14 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. यापूर्वी त्याने भारताकडून अखेरचा टी20 सामना नोव्हेंबर 2022 मध्ये खेळला होता. विराटने 14 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना भारताच्या विजयात खारीचा वाटाही उचलला.

रविवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने पहिल्याच षटकात रोहित शर्माची विकेट गमावली. त्यामुळे विराटला पहिल्याच षटकात मैदानात उतरावे लागले होते.

त्याने सलामीवीर यशस्वी जयस्वालची चांगली साथ देताना दुसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी विराट बाद झाल्यानेच तुटली. विराटने 16 चेंडूत 5 चौकारांसह 29 धावांची खेळी केली.

विराटचा विक्रम

विराटने ही 29 धावांची खेळी करण्याबरोबर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना 2000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. तो लक्ष्याचा पाठलाग करताना 2000 आंतरराष्ट्रीय टी20 धावा करणारा जगातील दुसराच, तर भारताचा पहिला क्रिकेटपटू आहे.

विराटपूर्वी केवळ आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना 2000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. स्टर्लिंगने आत्तापर्यंत 84 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना 2074 धावा केल्या आहेत. तसेच विराटने आत्तापर्यंत 52 आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग केला असून २०१२ धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू

  • 2074 - पॉल स्टर्लिंग (84 सामने)

  • 2012 - विराट कोहली (52 सामने)

  • 1788 - डेव्हिड वॉर्नर (61 सामने)

  • 1628 - बाबर आझम (53 सामने)

  • 1465 - रोहित शर्मा (71 सामने)

भारताचा विजय

दरम्यान, रविवारी विराट बाद झाल्यानंतर जयस्वाल आणि शिवम दुबे यांनी आक्रमक खेळत अर्धशतके पूर्ण केली. या सामन्यात दुबेने 32 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी केली. तसेच यशस्वी जयस्वालने 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 15.4 षटकात सहज 173 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT