Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 3rd ODI: कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड! अर्धशतक ठोकून दिग्गजांना सोडले मागे

IND vs AUS, 3rd ODI: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम मोडला.

Manish Jadhav

IND vs AUS, 3rd ODI: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम मोडला.

राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 61 चेंडूत 56 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. ग्लेन मॅक्सवेलने त्याला झेलबाद केले.

अर्धशतक झळकावून विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सर व्हिव्हियन रिचर्ड्सला मागे टाकले आहे.

दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने वनडेमध्ये 50 किंवा त्याहून अधिक 145 वेळा धावा केल्या आहेत.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराने 118 वेळा ही कामगिरी केली आहे. या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने रिकी पाँटिंगला मागे टाकले.

कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 113 पेक्षा जास्त वेळा धावा केल्या आहेत. या यादीत चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आहे, ज्याने 112 वेळा ही कामगिरी केली आहे. जॅक कॅलिसने 103 वेळा अशी कामगिरी केली आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3077 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर 2332 धावा आहेत. डेसमंड हेन्सने 2262 धावा केल्या आहेत.

व्हिव्हियन रिचर्ड्सला मागे टाकत विराट कोहली चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2228 धावा केल्या आहेत. विवियन रिचर्ड्सच्या नावावर 2187 धावा आहेत.

ODI मध्ये 50 पेक्षा जास्त स्कोअर

145 - सचिन तेंडुलकर

118 - कुमार संगकारा

113-विराट कोहली

112 - रिकी पाँटिंग

103 - जॅक कॅलिस

वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा

3077 - सचिन तेंडुलकर

2332 - रोहित शर्मा

2262 - डेसमंड हेन्स

2228 - विराट कोहली

2187 - सर व्हिव्हियन रिचर्ड्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT