IND vs AUS, 3rd ODI: मार्शचं शतक हुकलं, ऑस्ट्रेलियाकडून चौघांची फिफ्टी; भारतासमोर 353 धावांचं आव्हान

India vs Australia: तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 353 धावांचे आव्हान ठेवले आहे.
Mitchell Marsh | Steve Smith
Mitchell Marsh | Steve SmithDainik Gomantak
Published on
Updated on

India need 353 runs to win 3rd ODI Match against Australia:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 353 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 बाद 352 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून चौघांनी अर्धशतके केली.

Mitchell Marsh | Steve Smith
IND vs AUS: डावखुरा वॉर्नर अचानक करू लागला उजव्या हाताने बॅटिंग, नक्की काय झालं वाचा

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी सलामीला दमदार सुरुवात केली. त्यांनी 78 धावांची भागीदारी केली. यादरम्यान वॉर्नरने आक्रमक खेळताना 56 धावांची खेळी केली. पण त्याला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले.

मात्र त्यानंतर स्टीव्ह स्मिथने मार्शला शानदार साथ देत आक्रमक खेळ केला. या दोघांनीही शतकी भागीदारी करताना अर्धशतके केली. मात्र, मार्शला शतकाच्या अगदी जवळ असताना कुलदीप यादवने बाद करत धक्का दिला. मार्श 84 चेंडूत 96 धावांवर बाद झाला. त्याने 13 चौकार आणि 3 षटकार मारले.

Mitchell Marsh | Steve Smith
...अन् IND vs AUS सामन्यासाठी मैदानात पाणी नेण्यासाठी BCCI ला बोलवावे लागले चार स्थानिक खेळाडू

त्यानंतर स्मिथ 74 धावांवर बाद झाला. त्याला सिराजने पायचीत केले. स्मिथने त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार मारला. यानंतर लगेचच ऍलेक्स कॅरे आणि ग्लेन मॅक्सवेल बाद झाले.

मात्र, त्यानंतर मार्नस लॅब्युशेनने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. त्याने अर्धशतकही केले. मात्र तो 49 व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 72 धावांवर बाद झाला.

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com