Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: किंग कोहलीने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा आशियातील ठरला पहिला खेळाडू

Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानासोबतच सोशल मीडियावरही आपला दबदबा निर्माण करत आहे.

Manish Jadhav

Virat Kohli 250 Million Instagram Followers: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानासोबतच सोशल मीडियावरही आपला दबदबा निर्माण करत आहे. कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक पराक्रम केले आहेत.

तो नव-नवे रेकॉर्ड आपल्या नावावर करतच असतो. यातच आता आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड किंग कोहलीने आपल्या नावावर केला आहे, मात्र यावेळी त्याने मैदानावर नाही तर सोशल मीडियावर हा पराक्रम केला आहे.

विराटने विश्वविक्रम केला

विराटच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्या 250 मिलियनच्या पुढे गेली आहे. विराट कोहली त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 250 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

विराटचे हे अकाऊंट आता भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक फॉलोअर्स असणारे अकाऊंट बनले आहे. त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स फक्त पीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवर आहेत.

एकूणच, स्पोर्ट्समध्ये, क्रिस्टियानो रोनाल्डो 585 दशलक्ष फॉलोअर्ससह इंस्टाग्रामवर आघाडीवर आहे, तर लिओनेल मेस्सी 462 दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. एवढेच नाही तर विराट कोहली 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारा पहिला भारतीय देखील आहे.

विराट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन करोडोंची कमाई करतो

हूपरच्या 2022 च्या इंस्टाग्राम रिच लिस्टनुसार, विराटला प्रायोजित पोस्टमधून सुमारे 8.69 कोटी रुपये मिळतात. इंस्टाग्रामवरुन कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली 14 व्या क्रमांकावर आहे.

फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 15 कोटी रुपये घेतो. विराट कोहलीचे ट्विटर अकाऊंटवर 50 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

केवळ पीएमओचे अधिकृत ट्विटर अकाउंट आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटचे भारतात जास्त फॉलोअर्स आहेत.

IPL 2023 मध्ये चाहत्यांची मने जिंकली

IPL 2023 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने 14 सामन्यांमध्ये 639 धावा केल्या.

त्याचवेळी, आयपीएलपूर्वी कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावून कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळही संपवला होता. विराट कोहली आता WTC फायनलसाठी लंडनला पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

SCROLL FOR NEXT