Virat Kohli - Anushka Sharma Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final पूर्वी विराट-अनुष्का फुटबॉलचा घेणार आनंद! 'या' स्पर्धेच्या फायनलसाठी खास आमंत्रण

कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी विराट आणि अनुष्का फुटबॉल सामन्यासाठी उपस्थित राहू शकतात.

Pranali Kodre

Virat Kohli and Anushka Sharma attend FA Cup final: भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला 7 जूनपासून लंडनमधील द ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे.

या अंतिम सामन्यासाठी सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांची कसून तयारी सुरू आहे. याचदरम्यान भारतीय संघातील फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना एफए कपच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

मँचेस्टर युनाटेड आणि मँचेस्टर सिटी या दोन संघात शनिवारी एफए कपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता वेम्बली स्टेडियमवर होणार आहे. याच सामन्यासाठी विराट आणि अनुष्कासह अन्य देशातील काही खेळाडूंनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

एनआयने दिलेल्या वृत्तानुसार विराट आणि अनुष्का यांना एफए कपच्या अंतिम सामन्यासाठी जर्मन स्पोर्ट्सवेयर ब्रँड पुमा आणि इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटीने विशेष अतिथी म्हणून अमंत्रित केले आहे. विराट आणि अनुष्का भारतात पुमा कंपनीचे ब्रँड अँबेसिडर आहेत. तसेच पुमाचा मँचेस्टर सिटीशीही देखील करार आहे.

दरम्यान, आता विराट आणि अनुष्का या सामन्यासाठी उपस्थित राहणार का हे पाहावे लागणार आहे.

विराट भारतीय संघासह व्यस्त

विराट सध्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करण्यात व्यस्त आहे. आयपीएल 2023 नंतर या अंतिम सामन्यासाठी संपूर्ण भारतीय संघ लंडनमध्ये एकत्र आला असून सरावालाही सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचे सरावादरम्यानचे अनेक व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होत आहेत.

विराट चांगल्या फॉर्ममध्ये

विराट यंदाच्या वर्षात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२३ स्पर्धेतही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना दमदार कामगिरी केली. त्याने 14 सामन्यांमध्ये 53.25 च्या सरासरीने 639 धावा केल्या आहेत. तसेच त्याने या हंगामात दोन सलग शतकेही ठोकली.

दरम्यान, विराटने यावर्षी वनडे आणि कसोटीतही शतके केली आहेत. त्यामुळे त्याच्याकडून हाच फॉर्म कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातही कायम राहण्याची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.

अनुष्काचा येणार चित्रपट

दरम्यान, अनुष्काने भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर अधारित चित्रपट चकदाह एक्सप्रेसमध्ये प्रमुख भुमिका साकारली आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT