Virat Kohli-Anushka Sharma was Blessed with a Baby Boy Named Akaay Dainik Gomantak
क्रीडा

Virat Anushka's Son Name: विरुष्का दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! वामिकाला मिळाला भाऊ, मुलाचं ठेवलं 'हे' नाव

Virat Kohli - Anushka Sharma 2nd Child Name: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली असून, त्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

Pranali Kodre

Virat Kohli-Anushka Sharma Blessed with a Baby Boy:

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे जोडपं दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. अनुष्का आणि विराट यांना 15 फेब्रुवारी 2024 रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. याबद्दल विराट आणि अनुष्का यांनी मंगळवारी (20 फेब्रुवारी) सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. मात्र, विराट आणि अनुष्का यांनी याबाबत शेवटपर्यंत मौन पाळलं होतं.

दरम्यान, विराटचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स याने काही दिवसांपूर्वीच विराट दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे सांगितले होते, पण नंतर त्याने युटर्न घेत असे काही नसल्याचे म्हटले होते. मात्र आता विराट आणि अनुष्का यांनीच त्यांना मुलगा झाल्याचे सांगत या चर्चांना पुर्णविराम लावला आहे.

विराट - अनुष्काने पोस्ट करत सांगितलं मुलाचं नाव

विराट आणि अनुष्का यांना 2021 मध्ये पहिली मुलगी झाली होती. तिचे नाव त्यांनी वामिका ठेवले होते. आता तीन वर्षांनी वामिकाला भाऊ मिळाला आहे. विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलाचं नाव अकाय ठेवलं आहे.

याबद्दल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की 'खूप आनंदाने आणि प्रेमाने भरलेल्या हृदयाने तुम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या मुलाचे अकायचे आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले आहे.'

'आम्हाला आमच्या आयुष्यातील या सुंदर क्षणात तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो क तुम्ही या काळात आमच्या खाजगी आयुष्याचा आदर राखाल.'

विराट आणि अनुष्काच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून अनेकांनी त्यांना या गोड बातमीबद्दल शुभेच्छा दिल्या आहे.

विराट आणि अनुष्का यांनी डिसेंबर 2017 मध्ये कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत इटलीमध्ये लग्न केले होते.

विराटच्या कसोटी मालिकेतून माघार

दरम्यान, सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मात्र विराटने या मालिकेतून वैयक्तिक कारण देत माघार घेतली होती. त्याने याबाबत बीसीसीआयला विनंती केली होती. मात्र, त्याचे नेमके वैयक्तिक कारण काय होते, याबाबत बीसीसीआयने कोणतीही स्पष्ट माहिती दिली नव्हती.

पण आता विराट दुसऱ्यांदा बाबा झाल्याने हेच त्याच्या कसोटी मालिकेतून माघारी मागील कारण असल्याबद्दल दाट शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, आता या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये विराट पुनरागमन करणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT