Virat - Anushka: डेट करण्यापूर्वीच विराटचं जडलेलं अनुष्कावर प्रेम? एका मेसेजनं केलेला खुलासा

विराट कोहलीने अनुष्काबरोबर डेटिंग सुरु होण्यापूर्वी केलेल्या एका मेसेजबद्दल नुकताच खुलासा केला आहे.
Virat Kohli - Anushka Sharma
Virat Kohli - Anushka SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli - Anushka Sharma: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांची जोडी बऱ्याचदा चाहत्यांमध्ये चर्चेत असते. त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेणे चाहत्यांना आवडते. नुकतेच विराटने ते रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वीच्या दिवसांबद्दल खुलासा केला आहे.

विराटने त्याचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सच्या युट्यूब शोमध्ये अनुष्काबरोबरील नात्याची कशी सुरुवात झाली याबद्दल सांगितले आहे. त्याने सांगितले की त्यांच्या मैत्रीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याने एक मेसेज अनुष्काला पाठवला होता, ज्यानंतर त्याला एकदम गांगारल्यासारखे वाटले.

Virat Kohli - Anushka Sharma
Virat-Anushka :"अनुष्काने मोठा त्याग केलाय"...'विराट कोहली'ने सांगितलं रहस्य

विराटने सांगितले की "आम्हाला एकत्र फिरून वैगरे काहीच दिवस झाले होते. मला आठवते, एक दिवस मी अनुष्काला मेसेज केला की 'तुला माहित आहे का, जेव्हा मी सिंगल होतो, तेव्हा मी हे करायचो, ते करायचो.' त्यावेळी तिची रिऍक्शन अशी होती की 'होता, म्हणजे तुला काय म्हणायचंय?'"

विराटने पुढे सांगितले 'खरंतर मी माझ्या मनात आधीच ठरवले होते की आम्ही डेटिंग करत आहोत. त्यावेळी मला थोडं गांगारल्यासारखे झाले होते.'

Virat Kohli - Anushka Sharma
Virat Kohli Dance: किंग कोहलीलाही चढली 'नाटू नाटू'ची क्रेझ, लाईव्ह मॅचमध्येच सुरु केला डान्स

याशिवाय विराटने अनुष्काबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल देखील खुलासा केला. त्याने सांगितले की साल २०१३ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला कर्णधार करण्यात आले होते. त्याचवेळी त्याच्या मॅनेजरने अनुष्काबरोबर शुट करायचे असल्याचे सांगितले होते. ते ऐकल्यानंतर विराट खूप नर्वस झाला होता.

त्याने सांगितले की त्याला अनुष्काशी कसे बोलायचे हे कळत नव्हते. त्यामुळे त्याने तिच्या हिल्सवर एक जोक केला होता. त्याने म्हटले होते, की 'तुला अजून काही उंच घालायला मिळाले नाही का? त्यावर तिने एक्सक्यूज मी, अशी प्रतिक्रिया दिली होती.' विराटने सांगितले की त्याचा जोक खुपच वाईट होता. पण नंतर तिच्याशी बोलल्यानंतर त्याला त्यांच्या कुटुंबातील समानता जाणवली. नंतर हळुहळू त्यांच्यात मैत्री झाली.

विराट आणि अनुष्का यांनी डिसेंबर २०१७ मध्ये इटलीत लग्नगाठ बांधली होती. त्यांना आता दोन वर्षांची मुलगीही असून तिचे नाव वामिका ठेवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com