Viral Video
Viral Video Daink Gomantak
क्रीडा

Viral Video: हजारवेळा बघितला तरी मन भरणार नाही, क्रिकेटचा 'हा' व्हिडिओ तुम्हाला खळखळून हसवेल

Pramod Yadav

Viral Video: क्रिकेट विश्वातील अनेक व्हिडिओ नेहमी समोर येत असतात. कधी मैदानावर कोणी उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण केले, झेल घेतला, विकेट घेतली किंवा काही मजेशीर घटना देखील मैदानावर घडत असतात. त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होतात. अलिकडे विविध ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवले जातात त्याचे विविध व्हिडिओ समोर येतात व खळखळून हसवतात.

असाच एक व्हायरल व्हिडिओ (Viral Social Media Video) समोर आला असून, हा व्हिडिओ देखील तुम्हाला हसवल्याशिवाय राहणार नाही.

स्थानिक स्तरावर अनेक क्रिकेट चषक भरवले जातात. असाच एक चषक पनवेल (Panvel) येथे भरविण्यात आला आहे. त्यात एका सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. फलंदाजाने टोलवलेला चेंडूचा मैदानावर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला अंदाज घेता आला नाही. त्यानंतर उसळी घेतलेला चेंडू दुसऱ्या दिशेने वेगाने पुढे जातो.

क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करून तो आडवतो, पण चेंडूसह तो खाली पडतो. तरीही हातातील चेंडू यष्टीरक्षकाकडे टाकण्याचा प्रयत्न करताना तो चेंडू त्याचा पायाला लागून सीमारेषेच्या बाहेर जातो.

व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असून, लोकांना हसू अवरेनासे झाले. प्रमोद स्मृती चषक 2023 - रिटघर पनवेल (Panvel Cricket Tournament) असे या क्रिकेट चषकाचे नाव असून, त्याचे दुसरे पर्व सध्या सुरू आहे. त्याच चषकातील एका सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे.

अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया (Social Media) अकाऊटवर शेअर केला आहे. यापूर्वी बेळगाव येथे अशाच एका क्रिकेट सामन्यात अप्रतिम झेल घेतला होता. त्याचा देखील व्हिडिओ सोळ मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. अनेक खेळाडू आणि राजकीय लोकांनी देखील तो व्हिडिओ शेअर केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT