Vinod Kambli & Andrea Hewitt  Dainik Gomantak
क्रीडा

Team India: व्यसनामुळे टीम इंडियाच्या 'या' धाकडचं करिअर उद्ध्वस्त, गर्लफ्रेंडही झाली गरोदर

Indian Cricket Team: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीवर मद्यधुंद अवस्थेत पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

Manish Jadhav

Indian Cricket Team: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीवर मद्यधुंद अवस्थेत पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. विनोद कांबळीची पत्नी अँड्रिया हेविट हिने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अमली पदार्थांच्या व्यसनामुळे विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्दही उद्ध्वस्त झाली.

दरम्यान, विनोद कांबळीच्या कारकीर्दीचा आलेख सुरुवातीला खूप वेगाने वर चढला होता. भारतीय संघाचे भवितव्य तोपर्यंत सांगितले होते. परंतु अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्याची क्रिकेट कारकीर्द संपली.

दुसरीकडे, खुद्द विनोद कांबळीने एका मुलाखतीत ड्रग्सच्या व्यसनामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची कबुली दिली होती. आता सर्व सोडून परत येण्यास तयार असल्याचेही त्याने सांगितले होते. मात्र त्याची पत्नी अँड्रिया हेविट हिने पोलिसांत (Police) तक्रार दाखल करुन पुन्हा एकदा तणाव वाढवला आहे.

त्याचबरोबर, अँड्रिया हेविट ही विनोद कांबळीची दुसरी पत्नी आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव नोएला लुईस आहे. अँड्रिया हेविट लग्नाआधीच विनोद कांबळीच्या मुलाची आई बनली होती. मुलगा जीसस क्रिस्टियानो कांबळीच्या जन्मानंतर सुमारे 4 वर्षांनी दोघांनी लग्न केले होते.

तसेच, विनोद कांबळी टीम इंडियासाठी (Team India) एकूण 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळला आहे. विनोदने एकदिवसीय सामन्यांमध्ये 54.2 च्या सरासरीने 1084 धावा आणि कसोटीत 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT