Sai | Goa U16 Cricket 
क्रीडा

Vijay Merchant Trophy: साईने खिंड लढवल्याने हैदराबादविरुद्ध गोव्याचा डाव सावरला

Goa vs Hyderabad U16: हैदराबादविरुद्ध गोव्याने पहिल्या डावात १८६ धावा केल्या.

किशोर पेटकर

Vijay Merchant Trophy, Goa vs Hyderabad U16, 1st Day:

साई नाईक याच्या तळाच्या फलंदाजांसह खिंड लढविल्यामुळे विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत हैदराबादविरुद्ध पहिल्या डावात गोव्याला थोडेफार सावरता आले. पहिल्या डावात त्यांनी सर्वबाद १८६ धावांची मजल मारली.

सूरत येथील खोलवाड जिमखाना मैदानावर तीन दिवसीय सामन्याला बुधवारी सुरवात झाली. मागील लढतीत सौराष्ट्राला हरविलेल्या गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा हैदराबादने १ बाद ३८ धावा केल्या होत्या.

सलामीच्या स्वप्नेश नाईक याच्या ३३ धावांनंतरही गोव्याचा पहिला डाव ६ बाद ८१ असा घसरला. साई याने संयमी फलंदाजीच्या बळावर शमिक कामत (२६) याच्यासमवेत सातव्या विकेटसाठी ५५ आणि नंतर आठव्या विकेटसाठी द्विज पालयेकर (१७) याच्यासमवेत ३९ धावांची भागीदारी करून गोव्याला सावरण्याचा प्रयत्न केला.

अश्विनन राम याने साई याला त्रिफळाचीत बाद केल्यानंतर गोव्याचा डाव जास्त लांबला नाही. साई याने १०९ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: ७५.३ षटकांत सर्वबाद १८६ (आराध्य गोयल १६, स्वप्नेश नाईक ३३, शुधित गुरव ०, रेयान केरकर १, प्रद्युम्न अटपडकर १५, चिगुरुपती व्यंकट ८, साई नाईक ४३, शमिक कामत २६, द्विज पालयेकर १७, समर्थ राणे ६, ओम खांडोळकर नाबाद १, प्रेम गोणे १७-२, बी. अश्विन राम ४९-२, व्ही. यशवीर ३३-४).

हैदराबाद, पहिला डाव: १२ षटकांत १ बाद ३८ (जसवंत मोटे नाबाद १७, आदित १७, समर्थ राणे ६-१-१४-१, शमिक कामत ४-०-२०-०, द्विज पालयेकर २-०-२-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: सत्तरीतील वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाचा भक्ती दंग

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

SCROLL FOR NEXT