Om Khandolkar - Aradhya Goyal 
क्रीडा

Vijay Merchant Trophy: शेवटच्या विकेटमुळे गोव्याविरुद्ध हैदराबादला आघाडी

Goa vs Hyderabad U16: गोव्याच्या फिरकी गोलंदाजांचा प्रभावी मारा, पण वर्चस्व निसटले.

किशोर पेटकर

Vijay Merchant Trophy, Goa vs Hyderabad U16, 2nd Day:

गोव्याच्या ओम खांडोळकर, आराध्य गोयल, द्विज पालयेकर यांच्या प्रभावी फिरकी गोलंदाजीमुळे हैदराबादचा पहिला डाव घसरला, परंतु शेवटच्या विकेटसाठी बी. अश्विनन राम याने सुधीव नीरुकोंडा याच्यासमवेत अर्धशतकी भागीदारी करून विजय मर्चंट करंडक 16 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात संघाला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.

सूरत येथील खोलवाड जिमखाना मैदानावर तीन दिवसीय सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी गोव्याच्या 186 धावांना उत्तर देताना हैदराबादचा डाव 9 बाद 171 असा गडगडला होता.

त्यानंतर झुंजार फलंदाजी केलेल्या अश्विनन याने सुधीव याच्यासमवेत शेवटच्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. त्यामुळे हैदराबादला 221 धावांची मजल गाठत पहिल्या डावात 35 धावांची आघाडी घेता आली. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गोव्याने दुसऱ्या डावात 2 बाद 86 धावा करून 51 धावांची आघाडी प्राप्त केली.

अश्विनन राम याने 79 धावा केल्या. त्याने 117 चेंडूंचा सामना करताना आठ चौकार व सहा षटकार मारले. त्याला शेवटच्या विकेटसाठी मोलाची साथ दिलेला सुधीव सहा धावांवर नाबाद राहिला.

त्यापूर्वी अश्विनन याने सातव्या विकेटसाठी शेख रेहान (35) याच्यासमवेत 61 धावांची भागीदारी केल्यामुळे हैदराबादला 6 बाद 103 वरून सावरता आले होते. गोव्यातर्फे डावखुऱ्या ओम याने 48 धावांत 4 गडी बाद केले. आराध्य याने 3, तर द्विज याने 2 फलंदाजी माघारी धाडले.

दुसऱ्या डावात स्वप्नेश नाईक (31) व प्रद्युम्न अटपडकर (31) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची अभेद्य भागीदारी केल्यामुळे गोव्याला पहिल्या डावातील पिछाडी भरून काढता आली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: 186

हैदराबाद, पहिला डाव (1 बाद 38 वरून): 74.2 षटकांत सर्वबाद 221 (जशवंत मोटे 30, देव मेहता 38, शेख रेहान 35, बी. अश्विनन राम 79, समर्थ राणे 19-2-63-1, शमिक कामत 11-2-40-0, द्विज पालयेकर 20-1-52-2, ओम खांडोळकर 18-5-48-4, आराध्य गोयल 6.2-0-16-3).

गोवा, दुसरा डाव: 27 षटकांत 2 बाद 86 (आराध्य गोयल 12, स्वप्नेश नाईक नाबाद 31, रेयान केरकर 1, प्रद्मुम्न अटपडकर नाबाद 31).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT