Cricket Fan Dainik Gomantak
क्रीडा

CSK च्या चाहत्यानं चिअर लिडर्सलाही करायला लावली त्याची कॉपी, Dance Video तुफान व्हायरल

एका आयपीएल सामन्यादरम्यान एका चाहत्याच्या डान्स स्टेप्सची कॉपी चिअर लिडर्स करत असतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

IPL Viral Video: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सुरू झाली की क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येतो. प्रत्येकवर्षी साधारण दोन महिन्यांच्या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेला चाहत्यांकडून मोठा प्रतिसादही मिळतो. भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू अनेक परदेशी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळताना दिसतात.

यादरम्यान सामने पाहाण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्येही हजेरी लावतात. काही चाहते तर अनोख्या गोष्टीही करताना दिसतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की स्टेडियममध्ये सामना पाहाण्यासाठी आलेल्या एक क्रिकेट चाहत्याच्या डान्स स्टेप्सप्रमाणेच चिअर लिडर्स नाचत आहे. आयपीएलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक संघाला चिअर करण्यासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर चिअर लिडर्स असतात.

दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून समजते की मैदानात चेन्नई सुपर किंग्सचा सामना सुरू आहे. कारण मैदानात अनेक प्रेक्षकांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातलेले दिसत आहेत. तसेच जो चाहता नाचत आहे, त्यानेही चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घातली आहे.

तो ज्याप्रकारे नाचत आहे, त्याचप्रकारे त्याच्या समोर मैदानाच्या कुंपनाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चीअर लिडर्स नाचत आहेत. यावेळी आजूबाजूचे प्रेक्षकही शिट्ट्या वाजवत आहेत. या व्हिडिओच्या शेवटी असेही दिसते की तो चाहता नाचून झाल्यावर चिअरलिडर्ससमोर आदराने खाली वाकला.

त्याच्या या कृतीचेही कौतुक होत आहे. तसेच या व्हिडिओला सोशल मीडिया युजर्सकडून मोठी पसंती मिळत आहे. दरम्यान हा व्हिडिओ कोणत्या सामन्यातील आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

अखेरच्या टप्प्यात आयपीएल 2023 स्पर्धा

आयपीएल 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत 47 सामने खेळून पूर्ण झाले असून आता साखळी फेरीतील केवळ 23 सामने उरले आहेत. त्यानंतर प्लेऑफमधील प्रवेश करणारे अंतिम 4 संघ निश्चित होतील. सध्यातरी अव्वल क्रमांकावर 12 गुणांसह गुजरात टायटन्स आहे. तसेच लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स प्रत्येकी 11 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे चारही संघांचे प्रत्येकी 10 गुण आहेत. पण नेट रनरेटच्या फरकामुळे अनुक्रमे चौथ्या ते सातव्या क्रमांकावर आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघ 8 गुणांसह आठव्या क्रमांकावर आणि सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स प्रत्येकी 6 गुणांसह नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT