James Anderson Dainik Gomantak
क्रीडा

James Anderson: बॅट्समनच्या मनात धडकी भरवणारा अँडरसन जेव्हा दाखवतो फुटबॉल कौशल्य...

Video: जेम्स अँडरसन ऍशेस सामन्यादरम्यान फुटबॉल कौशल्य दाखवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

James Anderson shows off football skills: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस 2023 मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होत आहे. या सामन्यात पहिल्या तीन दिवसानंतर इंग्लंडचे वर्चस्व दिसून आले आहे. याच सामन्यातील सध्या एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन त्याचे फुटबॉल कौशल्य दाखवताना दिसत आहे.

आपल्या स्विंग गोलंदाजीने अनेक फलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या 40 वर्षीय अँडरसनचे व्हिडिओमध्ये चेंडूवर नियंत्रण ठेवताना दिसणारे त्याचे पदललित्य पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. या व्हिडिओमध्ये अँडरसन त्याच्या पायाने चेंडू जमिनीवर पडू न देता उडवत आहे.

दरम्यान, अँडरसनला सध्या सुरू असलेल्या ऍशेस 2023 स्पर्धेत खास काही अद्याप करता आलेले नाही. पण तो इंग्लंड संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. अँडरसन इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे.

तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 394 सामन्यांमधील 547 डावात मिळून 975 विकेट्स घेतल्या आहेत. मुरलीधरनच्या नावावर 1347 विकेट्स आहेत, तर वॉर्नने 1001 विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडचे सामन्यात वर्चस्व

सध्या मँचेस्टरला सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 90.2 षटकात सर्वबाद 317 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्युशेनने 51 धावांची आणि मिचेल मार्शनेबी 51 धावांची खेळी केली होती. तसेच ट्रेविस हेडने 48 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावांची खेळी केली होती. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने ५ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 107.4 षटकात तब्बल 592 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडकडून झॅक क्रावलीने 189 धावांची खेळी केली. तसेच जॉनी बेअरस्टोने नाबाद 99 धावांची खेळी केली. त्याचबरोबर मोईन अली (54), जो रुट (84), हॅरी ब्रुक (61) आणि बेन स्टोक्स (51) यांनी अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेजलवूडने ५ विकेट्स घेतल्या.

इंग्लंडने तब्बल 275 धावांची आघाडी घेतल्यानंतर तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 41 षटकात 4 बाद 113 धावा केल्या आहेत. अद्याप ऑस्ट्रेलिया 162 धावांनी पिछाडीवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT