Video Viral Conversation between Marcus Harris and Ben Stokes recorded on stump mic

 

Dainik Gomantak

क्रीडा

Video Viral: हॅरिसने डीआरएसबाबत वापरले अपशब्द

फलंदाजाने डीआरएस घेतला आणि त्यानंतर अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरिस (Marcus Harris) आणि इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) यांच्यातील संभाषण स्टंप माईकवर रेकॉर्ड करण्यात आले आहे, ज्याचा व्हिडिओ (Video) सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की हॅरिस कसे विनोदी पद्धतीने Drs ला शिव्या देत आहे. यादरम्यान त्याच्या तोंडून अपशब्दही निघाले, ज्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होत आहे. अॅशेस मालिकेतील तिसर्‍या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हॅरिसला ऑनफिल्ड अंपायरने स्टोक्सच्या बॉलवर आऊट दिले, पण फलंदाजाने डीआरएस घेतला आणि त्यानंतर अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला.

जेव्हा हॅरिस (Marcus Harris) नॉन स्ट्रायकरच्या शेवटी आला तेव्हा स्टोक्सने (Ben Stokes) त्याला विचारले की काय झाले? त्यानंतर हॅरिसने त्याला संपूर्ण कथा सांगितली आणि शेवटी डीआरएसबद्दल अपशब्द वापरले, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. असे केल्याने हॅरिसला दंड होवू शकतो का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

ऑस्ट्रेलिया टिम ऍशेस मालिकेत (Ashes Series) 2-0 ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा संघ 185 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजही संघर्ष करताना दिसले. ऑस्ट्रेलियाने 104 धावांत चार महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या. डेव्हिड वॉर्नर, नॅथन लियॉन, मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. हॅरिसने आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''गोवा में 15 साल भाजप आ नहीं सकती''; दिगंबर कामतांचा Video Viral, मुख्यमंत्र्यांनी वाजवल्या टाळ्या; नेटकरी थक्क!

Kolkata Crime: कोलकाता पुन्हा हादरलं! बर्थ डे पार्टीतच 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; मित्रच ठरले कर्दनकाळ

Bomb Blast In Pakistan: पाकिस्तानमध्ये LIVE क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी Watch Video

Affordable 350CC Bikes: स्पोर्टी लूक, दमदार परफॉर्मन्स...! 'या' धमाकेदार बाइक्समध्ये मिळतंय सर्व काही, किंमत फक्त...

Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

SCROLL FOR NEXT