Jo-Wilfried Tsonga Twitter
क्रीडा

VIDEO: फ्रेंच स्टार जो-विल्फ्रेड सोंगाने रडत रडत केला टेनिसला अलविदा

जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानावर पोहोचलेला विल्फ्रेड सोंगा 2008 ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता

दैनिक गोमन्तक

फ्रेंच स्टार टेनिसपटू जो-विल्फ्रेड सोगाने (Jo-Wilfried Tsonga) टेनिसला (Tennis) कायमचा टाटा केला आहे. फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरीत 8व्या मानांकित कॅस्पर रुडकडून पराभूत झाल्यानंतर सोंगाने टेनिस सोडण्याचा निर्णय घेतला. रुडेने सोंगाचा 6-7, 7- 6, 6- 2, 7- 6 असा पराभव केला. आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात सोंगा ढसाढसा रडला. (French Open)

आपल्या कारकिर्दीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचलेला सोंगा 2008 ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता आणि फ्रान्सच्या डेव्हिस कप विजेत्या संघाचा सदस्य होता. मात्र दुखापतींमुळे त्याच्या टेनिस कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला आणि गेल्या वर्षी 36 व्या वर्षी त्याने वर्षातून 18 सामने खेळण्याचा निर्णय घेतला होता.

प्रेक्षकांसमोर टेनिसला निरोप देताना तो म्हणाला की, असे वातावरण मी कधी पाहिले नाही. यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. जर मी जिंकू शकलो असतो, हा क्षण आणखी सुंदर झाला असता. अन्य सामन्यांमध्ये डेन्मार्कच्या होल्गर रुनेने 14व्या मानांकित डेनिस शापोवालोव्हचा 6-3, 6-1, 7-6 असा पराभव केला. दुसरीकडे चौथ्या मानांकित सित्सिपासने लोरेन्झो मुसेट्टीचा 5-7, 4- 6, 6- 2, 6 -3, 6- 2 असा पराभव केला.

महिला विभागात 2017 ची चॅम्पियन येलेना ओस्टापेन्को, 2018 ची चॅम्पियन सिमोना हालेप, 7वी मानांकित एरिना सबालेन्का, नववी मानांकित डॅनिएल कॉलिन्स, 11वी मानांकित जेसिका पेगुला यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT