LSG प्रशिक्षक विजय दहिया यांना टीम इंडियाऐवजी U-19 चे करायचे कोच

खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर दहिया यांनी प्रशिक्षक म्हणून नवी इनिंग सुरू केली आणि त्यात ते पुर्णपणे यशस्वी ठरले.
Vijay Dahiya
Vijay DahiyaDainik Gomantak
Published on
Updated on

भारताचा माजी विकेट किपर (Wicket-keeper) फलंदाज विजय दहिया (Vijay Dahiya) याला भारताकडून फक्त 2 कसोटी आणि 20 वन डे मॅच सामने खेळण्याची संधी मिळाली. पण, खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर दहिया यांनी प्रशिक्षक म्हणून नवी इनिंग सुरू केली आणि त्यात ते पुर्णपणे यशस्वी ठरले. दिल्ली रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून, दहियाने 2007-08 मध्ये 16 वर्षांचा दुष्काळ संपवला आणि आपल्या गृहराज्यालाच चॅम्पियन बनवले. (LSG coach Vijay Dahiya wants to train under 19s instead of Team India)

Vijay Dahiya
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने सांगितले पराभवाचे कारण

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी (KKR) त्याने असेच केले, जेव्हा गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वाखाली संघ दोनदा चॅम्पियन पदाचा मानकरी राहिला होता. कदाचित याच कारणामुळे गंभीर जेव्हा लखनऊ सुपर जायंट्स या नवीन फ्रँचायझीमध्ये मार्गदर्शक म्हणून सामील झाला तेव्हा त्याने सर्वात आधी त्याचा जुना जोडीदार दहियाला बोलावून घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com